
‘मदतीचा हात… पाठीवर थाप’ – संवेदनांच्या स्पर्शाने उजळले गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य
कै. भूषण गुंजाळ स्मृतीप्रित्यर्थ ‘संवेदना भूषण’ उपक्रम उत्साहात संपन्न. गडहिंग्लज, लोकहिरा न्यूज प्रतिनिधी “दान म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा प्रज्वलित करणे होय.” या उदात्त भावनेतून कै. भूषण गुंजाळ यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ कै. भूषण गुंजाळ मित्र मंडळ व संवेदना फाउंडेशन, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मदतीचा हात… पाठीवर थाप – संवेदना भूषण” हा हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम शनिवारी (दि. ११ जुलै) जागृती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज






















