
शिरोळ लोकहिरा प्रतिनिधी :-नांदणी हायस्कूल नांदणी मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे मा. श्री राजू आप्पा उगारे (प्रतिष्टीत नागरिक नांदणी) यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले क्रीडाज्योतीचे प्रज्वलन कु. सिदधी बुबणे व प्रमुख पाहुण्याचा हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक श्री.पी.बी. उपाध्ये सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. श्री. एस. एम. गरड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.न.म.अस्वलेसो चेअरमन स्कूल कमिटी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मा. मुख्याध्यापक यांच्या हस्ते शाल , बुके, देवून सत्कार करणेत आला. प्रमुख पाहुण्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व शाळेच्या प्रेमापोटी 5111 रुपये इतकी रोख देणगी दिली. कु संस्कृती सुतार हिने विद्यार्थाना क्रीडा शपथ दिली. जिमखाना विभाग प्रमुख श्री एस व्ही पाटील यांनी स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात स्पर्धेचे नियोजन करणेत आले आहे. खो-खो च्या मैदानाचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमा साठी शाळा समिती सदस्य व सल्लागार समिती सदस्य व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.एस.ए. देसाई मॅडम सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार सौ. एन. एस. कोळी यांनी मानले. सूत्रसंचलन सौ. व्ही. डी कणीरे यांनी केले.













