
- कक्केरी: तालुका खानापुर जि. बेळगावी येथील प्रतिनिधी:- राजेश होटकर
अखिल भारतीय ढोर कक्कय्या समाज मंडळच्या वतिने सोमवार,10/11/2025 रोजी कक्कय्या स्वामी मठ,कक्केरी येथे उत्साहात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला.अखिल भारतीय ढोर कक्कय्या समाज मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पोळ म्हणाले की,उत्सवात कक्कय्या समाज बांधव सहभाग होऊन, यशस्वीपणे दीपोत्सव कार्यक्रम पार पाडले बद्दल व उत्सवासाठी देणगी दिलेल्यांच ऋण व्यक्त केले.दीपोत्सवाची सुरुवात दीप प्रज्वलित करून समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत गरग हे समाजास उद्देशुन उत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवली पाहिजे असे मत व्यक्त केले. आपण सह परिवार कक्केरी मठाला पोहोचले पाहिजे असे हि आवाहन केले.मंडळाचे निर्देशक एस एफ नारायणकर यांनी,येत्या काळात शिवरात्री वेळी कक्कय्या स्वामीची नवीन मूर्ती प्रतिस्थापना व कळसारोहन महोत्सव साजारा होणार आहे.त्यावेळी सर्व समाज बांधवानी हजारो च्या संख्येने सहभाग होऊन महोत्सव यशस्वी संपन्न करूया आशी विनंती केली.अखिल कर्नाटक कक्कय्या हिंदू ढोर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी श्रेयकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्तिक दीपोत्सव पार पडला.यानंतर रांगोळी स्पर्धा वआतिषबाजी चा कार्यक्रम नयन रम्य आणि आनंदात झाला. शेवटी प्रसाद वाटप झाला.या कार्यक्रमात खंबीरपणे उभे राहिलेले मंडळाचे सरचिटणीस लक्ष्मीकांत घोडके यांचे कौतुक केले.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे,निर्देशक प्रमोद हुटगिकर,लक्ष्मण गजाकोश, बाळासाहेब पोळ, प्रभाकर कदम,मोहन गजाकोश,गंगाधर घोडके,यल्लाप्पा सवणुर,बाळू खराटे,निलेश नारायणकर, विलास होटकर,वीरभद्र हुटगी, आनंद घोडके, द्रौपदी श्रेयकर, सरोजा गजाकोश,शशिकला पोळ,कल्पना गरग,शोभा कदम इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन आणि आभार मंडळाचे सचिव
लक्ष्मीकांत घोडके यांनी केले















2 thoughts on “कक्केरी येथे भव्य कार्तिक दीपोत्सव उत्साहात.”
जय कक्कया
Jay kakkayya