August 3, 2026 4:25 pm

भक्त जन मंडळ, जरगनगर येथे “विठ्ठल माझा”मैफल रंगली…

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी;-

 

पावसाची तमा न करता”श्री ब्रह्मचैतन्य ग्रुप”ने भक्त जन प्रणीत सांस्क. हाँलमध्ये विठ्ठलाच्या गाण्यांची मैफल दि.१८/७/२६रोजी रंगवली.मंडळाचे जेष्ठ.(नावे) यांचे हस्ते विठ्ठलाच्या फोटोंस हार अर्पण केलाघालून मैफलीत सुरवात झाली.”तूज मागतो मी आता”या अभय नेर्लेकर यांनी गायलेल्या गणेश वंदना नंतर एका पाठोपाठ सुंदर ते ध्यान,मोगरा फुलला,जेथे जातो तेथे ,टाळ बोले चिपळीला,विठ्ठला तू वेडा कुंभार अशी गाणि सादर केली.मैफलीच्या उत्तरार्धात आदीत्य मैंदर्गीकर व अभय नेर्लेकर यां दोघांनी मिळुन कानडा राजा,माझे माहेर पंढरी सादर करीत उपस्थीतांची मने जिंकली, कार्यक्रमाचा शेवटआदीत्य व अभय यांनी”या विठूचा “या गजराने करीत असताना रसिक तल्लीन झाले होते
दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात यशवंत म्हैसकर,सुजाता वैद्य,दीपाली पोरे, किरण कुलकर्णी,अनुजा नाईक,पुष्पा कुलकर्णी यांनी १६गाणी सादर केली.ओघवत्या निवेदनअश्वीनी टेंबे यांनी केले व सर्वांचे आभार मानलै
————+-++——-

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!