

‘श्यामची आई ‘ संक्षिप्त आवृतीचे मानवरांच्या उपस्थित प्रकाशन.
साने गुरूजींनी मानवतेचा संदेश दिला – प्रा. डॉ. टी. एस. पाटील.
कोल्हापूर -लोकहिरा प्रतिनिधी
- मानवतेचे पुजारी पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई ‘ या पुस्तकाच्या संक्षिप्त आवृतीचे प्रकाशन भाई माधवराव बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. टी. एस. पाटील यांच्या हस्ते वसंतराव चौगुले नागरी सह. पतसंस्था सभागृह शाहुपूरी येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसन देसाई होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध साहित्यिका सौ. निलम माणगावे, श्यामची आई पुस्तकाचे संक्षेपक सिद्धेश्वर झाडबुके, साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष बाबुराव पाटील, मोहन सावंत, सुनिल पुजारी, आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव एम एस पाटोळे, गुलाबराव पाटील, रमेश काळे, पांडुरंग शिंदे, प्राचार्य जे. बी. बारदेसकर, मोहन देशमुख, सौ. संध्या वाणी, हेमलता पाटील, अशोक चौगुले, डी. के. रायकर, वृषाली कुलकर्णी, श्यामराव कांबळे, रघुनाथ मोरे, सुरेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, सध्या देशात जातीयतेची विषवल्ली वेगाने फैलावत आहे. अशावेळी पूज्य साने गुरुजींच्या मानवतावादी विचारांची देशाला गरज आहे. माणसातच देव आहे. दिन दलितांची सेवा करा, म्हणजे साने गुरुजींच्या विचाराचे आचरण झाले असे म्हणता येईल असे विचार प्रा. डॉ. टी एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हसन देसाई यांचे अध्यक्षीय भाषण झाले. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या वतीने अखंडीतपणे समता प्रसारित करण्याचे कार्य सुरु आहे.
‘श्यामची आई ‘ या पुस्तकाच्या रुपातून साने गुरुजींचा विचार नवीन पिढीपर्यंत पोहचेल. साने गुरुजी कथामाला गेली अनेक वर्षे मानवतेचा धर्म समाजात रुजविण्यासाठी कार्यरत आहेत. नवीन पिढीपर्यंत श्यामची आई हे पुस्तक पोहचविण्यासाठी कथामाला प्रयत्नशिल राहील असे प्रतिपादन हसन देसाई यांनी केले. यावेळी जे. बी. बारदेसकर, नीलम माणगावे, गुलाबराव पाटील, मोहन सावंत आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. आभार बाबुराव पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन अनिल चव्हाण व हेमलता पाटील यांनी केले.
Post Views: 311














1 thought on “देशात जातीयतेची विश्ववल्ली वेगाने फैलावत आहे,अशावेळी पूज्य साने गुरुजींच्या मानवतावादी विचारांची देशाला गरज.प्रा.डॉ.टी एस पाटील.”
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.