August 3, 2026 4:25 pm

जागृती’त गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात कष्टावर विश्वास ठेवा; यश हमखास मिळेल! ——निखिल जोशी

गडहिंग्लज (लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

जागृती हायस्कूल येथील दहावी गुणवंत विद्यार्थी गौरव प्रसंगी मार्गदर्शन करताना निखिल जोशी, व्यासपीठावर उपस्थित डॉ. सतीश घाळी, आय.जी. फुटाणे, अरविंद कितुरकर, बी.जी.भोसकी, गजेंद्र बंदी व इतर

संपत सावंत) दि. १८
‘जीवनात मोठे व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करा. मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने व जिद्दीने अखंड परिश्रम करा. कष्टावर विश्वास ठेवा. यश तुमच्या पाऊलाशी नक्की येईल’ असे प्रतिपादन निखिल जोशी यांनी जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथील इ. दहावी गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांच्या गौरव प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते.
विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. एस.एस.घाळी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांनी करून दिला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक लाख रुपयांची कायमस्वरूपी बक्षीस निधी दिल्याबद्दल माझी प्राचार्य आय.जी. फुटाणे यांचा सत्कार डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते झाला .प्रमुख पाहुणे निखिल जोशी म्हणाले, “अपयश आले, कमी गुण मिळाले म्हणून खचून जाऊ नका. नव्या उमेदीनिशी प्रयत्न करा. हमखास यश मिळेल.” आय.जी. फुटाणे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले,’ शाळेची सातत्याने होत असलेली प्रगती ही संस्थेच्या सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी राबविले जाणारे विविध उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.कुमारी चार्वी कुंभार व समर्थ सावरकर यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.अध्यक्षीय मनोगतातून डॉ. सतीश घाळी म्हणाले,”यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. माणुसकी, संवेदनशीलता, संघर्ष, त्याग, आणि प्रामाणिकपणा हे गुण आयुष्याला दिशा देतात. आई वडील, गुरुजन आणि समाजाविषयी आदराची भावना जपणारा विद्यार्थीच खऱ्या अर्थाने यशस्वी नागरिक बनतो” असे सांगितले.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत वेदांत धुंदरे, कुमारी चार्वी कुंभार, वेदांत पवार, कुमारी सलोनी मोहिते, कुमारी रिशीता पवार, अभंग देसाई, कुमारी श्रावणी सुतार, कुमारी श्रेया धडाम, कुमारी उन्नती माने, कुमारी रिद्धी कदम, प्रथमेश गणाचार्य, पौरस शेंडे, कुमारी तनिष्का गवळी, समर्थ सावरकर,कुमारी जान्हवी जाधव, प्रथमेश कांबळे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तुरकर, सचिव अँड .बी.जजी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, नंदकुमार जोशी, माजी मुख्याध्यापक ए.के. कांबळे, श्रीरंग तांबे, डॉ.दत्ता पाटील, डॉ. एस. एन.शिंदे, शिवाजी अनावरे, महावीर कासार, प्रा. विद्या पन्हाळे, अनिल मसाळे, प्रा. स्वाती क्षीरसागर, रवींद्र भंडारे यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना शिंदे, अनिल कांबळे यांनी तर आभार सचिन मगदूम यांनी मानले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!