
शहापूर येथे घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन अल्पवयीन ताब्यात, १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी (लोकहिरा न्यूज प्रतिनिधी): शहापूर (ता. हातकणंगले) येथील सावली सोसायटी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात शहापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, तीन मोबाईल हँडसेट व मोटारसायकल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाणे, इचलकरंजी येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४२९/२०२५, बी.एन.एस. कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेंद्र छेडी यादव (वय ४८),












