January 15, 2026 9:52 pm

डॉक्टर राजीव नारायण शिंदे यांचे दैदिप्यमान यश.

कॅन्सर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर राजीव नारायण शिंदे हे पर्थ, ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत आहेत.
त्यांनी ४थ्या स्टेजचा कॅन्सर असलेल्या रुग्णावर नवीन पद्धतीने ६ महिने उपचार करून त्याला पूर्णपणे कॅन्सर मुक्त केले आहे. अशा प्रकारे कॅन्सर रुग्णावर लाइफ सेव्हिंग ड्रगचा वापर करून उपचार केलेला हा पहिला प्रयोग व प्रयत्न आहे. त्यामुळे डॉक्टर राजीव ना. शिंदे यांच्या कार्याचा गौरव करणारी बातमी ऑस्ट्रेलिया येथील शासकीय टी.व्ही.वर नुकतीच प्रसारित झाली आहे.
डॉ. राजीव ना. शिंदे ज्येष्ठ साहित्यिक व कस्टम्स उपायुक्त ना.म. शिंदे यांचे सुपुत्र आहेत.
डॉ.राजीव ना. शिंदे यांचे एम.बी.बी.एस. पर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले असून पुढील शिक्षण ऑस्ट्रेलिया व लंडन येथे झाले आहे. ते मूळचे सोलापूरचे आहेत.
डॉ. राजीव नारायण शिंदे यांनी परदेशात जाऊन वैद्यकीय क्षेत्रात आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व व स्थान निर्माण केले आहे. हे आपल्या समाजाला देशाला भूषणावह आहे.ही अनुकरणीय व अभिमानाची बाब आहे.
४ थ्या स्टेटचा कॅन्सर रूग्ण पुर्णपणे बरा करण्यासाठी डॉ.राजीव ना.शिंदे यांनी अवलंबलेली उपचार पद्धती व वैद्यकीय कौशल्यामुळे देशभरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!