August 3, 2026 4:26 pm

अंजली नारायणे यांना ‘महर्षी कर्वे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार – २०२६’

पुणे लोकहिरा न्यूज प्रतिनिधी;-

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य समारंभात ‘महर्षी कर्वे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार – २०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार एसएनडीटी कला वाणिज्य महिला महाविद्यालय, पुणे येथील उपप्राचार्या आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख *प्रा. डॉ. अंजली रामचंद्र कदम-नारायणे* यांना प्रदान करण्यात आला.

या समारंभात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल *श्री. जिष्णू देव वर्मा* यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू *प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव*, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री *श्री. मुरलीधर मोहोळ*, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री *श्री. चंद्रकांत दादा पाटील*, राज्यसभा सदस्य *सौ. मेघाताई कुलकर्णी* आणि राज्यपालांचे सचिव *डॉ. प्रशांत नारनवरे* यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्य, अध्यापनातील उत्कृष्टता, संशोधनातील योगदान तसेच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. नारायणे यांना हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी विविध सीएसआर फंड मिळवून दिल्यामुळे संस्थेच्या प्रगतीत मोलाची भर पडली.

या सन्मानामुळे एसएनडीटी कला वाणिज्य महिला महाविद्यालय, पुणे तसेच संपूर्ण एसएनडीटी परिवारासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!