April 17, 2026 7:58 pm

मंडळाच्या ऑफिस साठी ५५० चौ फूटाचा फ्लॅट घेण्याचे निश्चित केले फ्लॅट चे अग्रीमेंट या महिना अखेर होईल. अध्यक्ष हनुमंतराव सोनवणे

  • पुणे येथील लोकहिरा प्रतिनिधी
  • वीरशैव कक्कया समाज विकास मंडळ पुणे मार्फत भव्य वधुवर मेळावा,स्नेह सम्मेलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, विशेष प्राविण्य सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार या विविध कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 09/11/2025 रोजी पुणे येथे गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे आयोजन करण्यात आले होते.
  • त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुणे मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंतराव सोनवणे होते. सदर कार्यक्रमास महासंघाचे अध्यक्ष श्री निवृत्ती सावळकर, भिक्षेकरूचे डॉक्टर अभिजीत सोनवणे, कक्केरी देवस्थान चे अध्यक्ष श्री विठ्ठल पोळ व संचालक ॲडव्होकेट श्री केशव इंगळे, कोल्हापूर येथील उद्योजक श्री अनिल पोळ, जेष्ठ साहित्यिक ना म शिंदे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई ज्ञानराज चौगुले व चिरंजीव ॲडव्होकेट सत्यम चौगुले, पुणे साहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती प्रांजलीताई सोनवणे,गणेश विद्यामंदिर धारावी चे अध्यक्ष श्री शिवलिंग व्हटकर व सचिव श्री राजेश खंदारे, नरसिंग कावळे, कोल्हापूर मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजी पोळ व उपाध्यक्ष गणेश नारायणकर, जेष्ठ समाजसेवक व दलितमित्र निरंजन कदम, मिरज येथील समाजसेविका श्रीमती प्रतीक्षाताई सोनवणे, चाळीसगाव चे अध्यक्ष श्री शिवलाल साबणे, पुणे सकाळ चे मुख्य वार्ताहर श्री अनिल सावळे , पुणे येथील माजी अतिरिक्त आयुक्त , आयकर विभाग श्री किशोर कवडे ,  युवा उद्योजक अभिजित सोनवणे ,लोकहिरा न्यूज चे संपादक गणपती शिंदे , महासंघाचे सरचिटणीस प्रकाश दरवेशी,खजिनदार मनोज शिंदे, मुंबई प्रांताचे अध्यक्ष राम कोकणे,सकाळ मुंबई चे वार्ताहर संजय शिंदे , जेष्ठ समाजसेवक जगन्नाथ दरवेशी, मुंबई चे माजी नगरसेवक अशोक खरटमल, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत इंगळे, गुलबर्गा येथील निवृत्त कार्यकारी अभियंता शिवाजी कावळे, निवृत्त उपायुक्त महादेव कावळे, हल्ली खेड , बिदर चे नगरसेवक विजयकुमार जगदाळे , कुर्डूवाडी चे माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश कदम ,सोलापूर चे पत्रकार मनोज व्हटकर , डॉ प्रमोद अष्टेकर इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमा मध्ये समाज्यातील १०वी आणि १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या मध्ये प्रदीप सावळकर, सूर्यकांत इंगळे, दिपक गायकवाड इ.चाही विशेष सत्कार करण्यात आला. या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार समाज्यातील जेष्ठ समाजसेवक डॉ सीताराम चौगुले यांना देऊन गौरविण्यात आले. 
  • या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गुजरात येथील तीन हजार समाज बांधवांनी उपस्थित राहून लाभ घेतला. अध्यक्ष हनुमंतराव सोनवणे यांनी सांगितले की पुणे येथे मंडळाच्या ऑफिस साठी ५५० चौ फूटाचा फ्लॅट घेण्याचे निश्चित केले असून त्याची किंमत ४० लाखा पर्यंत जाते. या फ्लॅट चे अग्रीमेंट या महिना अखेर होईल. मंडळाकडे २८ लाख रुपये आहेत, उर्वरित रक्कमेसाठी समाज्यातील सदन व्यक्तीनी हातभार लावावा असे ही आवाहन करण्यात आले. कार्यक्रमा मध्ये विठ्ठल पोळ, डॉ अभिजित सोनवणे, ना म शिंदे, निवृत्ती सावळकर यांनी मार्गदर्शन केले.
  • दुपारच्या सत्रात वधू वर मेळावा घेण्यात आला. यासाठी अंदाजे २०० वधू वरानी नोंदणी केली. 
  • सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंतराव सोनवणे, संस्थापक अध्यक्ष डॉ धनंजय कोकणे, कार्याध्यक्ष श्री वसंत केळगंद्रे, सचिव ॲडव्होकेट श्री गंगाधर कोकणे , उपाध्यक्ष एडव्होकेट भीमाशंकर कटके व उल्हास कटके खजिनदार शांताराम गजरे , सहसचिव अशोक सदाफुले, माजी अध्यक्ष डॉ राय्यप्पा कटके, निरंजन होटकर, डॉ तानाजी कटके सुनील सोनवणे, शंकर कटके, सूर्यकांत सोनवणे, दयानंद कोकणे, सुनील फुलपगार, शिवाजी शिंदे , रोहित खरटमल यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी श्री लक्ष्मीकांत सदाफुले यांनी सर्व समाज बांधवांना स्नेह भोजन दिले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पी डी सोनवणे व वृषाली कटके यांनी केले. आभार प्रदर्शन भीमाशंकर कटके यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!