August 3, 2026 4:25 pm

तळेगाव इंद्रायणी कॉलेज येथे ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया वतीने जागृत उपक्रम

तळेगाव इंद्रायणी कॉलेज येथे ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया वतीने जागृत उपक्रम

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी;- श्रावणी कामत

तळेगाव : इंद्रायणी कॉलेज तळेगाव दाभाडे येथे ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया संस्थेच्या वतीने 11 वी नवीन ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना अन्याय विरुद्ध लढा कसा देणे आई वडील गुरुजन यांचा विश्वास कसे जपावे. मुला मुलींनी कोणत्याही परिस्थिती खचून न जाता जीवनात पूढे कसे जावे, लव्ह जिहाद यासारख्या गोष्टीला बळी पडू नये, मोठया माणसाचं आदर ठेवून संवाद कसा करावा, वाहतुक नियमाचे पालन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध वक्ते मा. नितीन फाकटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आयुष्यात एक दृढ निश्चित करणे एकच लक्ष साधून पूढे जाणे. फोन वर स्टेटस ठेवून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आपल्या कार्यातून व अभ्यातून चांगले गुण काढले तर शिक्षण आणि पालक मित्रमंडळी हे तुमचे स्टेटस ठेवतील.. कुठल्याही ऍप, सायबर च्या बळी पडू नका अश्या विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमांची सुरवात कॉलेज चे प्रा योगेश घोडके प्रस्तावना सौं सविता पालवे, संस्थेची माहिती. सौं रेश्मा फडतरे, दामिनी पथक विषयी माहिती सोनाली शिंदे, मनोगत श्री तुषार मेहता तर आभार श्री कृष्णा भांगरे यांनी केल
या कार्यक्रमास ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया च्या संस्थापक मललेशी कुमार पाणी, अध्यक्ष तुषार मेहता, उपाध्यक्ष रेश्मा फडतरे, सचिव प्रवीण दाभाडे, सहसचिव सविता पालवे, खजिनदार adv सुरेंद्र दाभाडे, adv तेजस दाभाडे, कृष्णा भांगरे, दिलीप वाघमारे, श्रावणी कामत, बाळशंकर, रुपाली मेहता, गोरख काकडे, जेष्ठ पत्रकार जगन्नाथ काळे, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!