April 18, 2026 12:29 am

तारदाळ मध्ये ५३ कोटीची पाणी योजना कार्यान्वित

चौकट

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

Oplus_131072
Oplus_131072

:- जावेद मुल्ला

तारदाळ खोतवाडी कोरोची या तीन गावांचा कोरोची मतदार गण अनेक वर्ष विकासा पासून वंचित होता २०१७ मध्ये प्रसाद खोबरे यांनी भाजपा मधून प्रवेश करून कोरोची मतदार संघात जिल्हा परिषद सदस्य म्हणून वर्णी लावली. आणि पाच वर्षात विकास कामांचा डोंगर उभा केला. तारदाळ खोतवाडी मध्ये ग्रामपंचायतीवर भाजपची निर्वीवाद सत्ता आहे. दोन्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजना घराघरात पोहचविण्यात त्यांना यश मिळाले आहे. यामध्ये महिलांना घरोघरी उज्वला गॅस देवून त्यांचे जिवनमान उचांवले आहे या सर्व विकास कामाबरोबर जिल्ह्यात एकमेव ५३ कोटीची जलजीवन  मिशन पाणी योजना तारदाळ मध्ये आणून ती कार्यान्वीत केली आहे तसेच कोरोना काळात कोरोची तारदाळ खोतवाडी मध्ये कोरोना केंद्र उभारून गोर गरीब जनतेला आरोग्याचा दिलासा दिला आहे. तर कोरोची परिसरात अनेक विकास कामा बरोबर शेतकऱ्यां साठी अनेक बंधारे उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आधार कार्ड मतदार नोंदणी संजय गांधी निराधार योजना यासह शासकीय अनेक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिला तसेच रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी महिलांसाठी मार्गदर्शन शिबीर महिला साठी कार्यशाळा महाश्रम कार्ड जॉब कार्ड लाडक्या बहिणीचे ऑन लाईन के वाय सी बांधकाम कामगार नोंदणी शिबीर पि एम किसान व लाडकी बहीण योजनेसाठी विशेष कॅम्प यासह अनेक मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रसाद खोबरे हे  नेहमीच प्रयत्न शिल राहिले आहेत त्यामुळे त्यांच्या या राजकीय किर्दीचा वा रसा  पाहता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी खोबरे यांच्या सुनबाई सौ प्रियंका प्रविण खोबरे या इच्छूक असून मतदारांची पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या निवडणूकीत कोरोची मतदार संघात प्रसाद खोबरे यांचेचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.

[ ] तारदाळ मधील महत्वपूर्ण कामे 

1. महावितरण एम एस ई बी चे पहिले सबस्टेशन प्राइड इंडिया जवळ चालू झाले आहे व दुसरे सबस्टेशन कॉलेजच्या पाठीमागे काम चालू आहे दोन महिन्यांमध्ये सबस्टेशन चालू होणार आहे. एका गावामध्ये दोन सब स्टेशन हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

2. तारदाळ खोतवाडी मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिवसा लाईट मिळावी यासाठी पाठपुरावा करून शेतीसाठी दिवसा लाईट मिळण्यासाठी प्रयत्न केले. 

3. जिल्हा परिषद कडून घेण्यात येणारा मानाचा राजर्षी शाहू छत्रपती – 2020 पुरस्कार मिळाला.

4. छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये झालेल्या मीटिंग मध्ये ठराव करून शासनाकडे मागणी केली.

5. जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद ची शाळा बांधण्यासाठी मोफत जागा देणाऱ्या व्यक्तीचे नाव शाळेवर देण्यासाठी जिल्हा परिषद च्या मीटिंगमध्ये ठराव करून तारदाळ मधील गौरीशंकर नगर येथे शाळेसाठी मोफत जागा दिलेल्या कै. लक्ष्मीबाई कलगोंडा पाटील यांचे नाव शाळेवर  देण्यात आले

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!