तारदाळ लोकहिरा न्यूज वार्ताहर:-


आयुष्याच्या विद्यापीठात किती माणसे वाचली हे महत्वाचे असून किती पदव्या आहेत हे महत्वाचे नाही. खुप मोठी मोठी स्वप्ने पहावीत. तसेच परिश्रमही खुप मोठे करावीत.आपल्यातील नेमके गुण हेरून त्याचा गुणाकार करणे गरजेचे आहे. म्हणजे जगणे सुलभ होईल. ज्ञान गंगे मध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी चाललेला हा नंदादीप गेली वीष वर्ष तारदाळ येथील साहित्य प्रेमी युवा मंच जपत आहे. असा श्रोता वर्ग वर्षानुवर्ष जपला जातो आहे. या ग्रामरत्न पुरस्काराच्या देण्याच्या निमित्ताने माझे हात सोन्याचे झाले असे मला वाटते. या कार्यक्रमाचे संचित घेवून मी जात आहे. याचे मला मनस्वी आनंद आहे. असे वक्तव्य तारदाळ येथील कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री डाँ निशिगंधा वाड यांनी केले.
तसेच शिव चरित्र व्याख्याते राहूल नलावडे बोलत असताना म्हणाले की पुरस्काराने प्रेरणा मिळते. शिवचरीत्रातही ऐतीहासीक काळात मावळ्यांनी केलेल्या कर्तबगार कामगिरी बद्दल महाराजांनी त्यांना सोन्याचा कडा देवून त्यांचा मान सन्मान केला. त्यामुळे त्याकाळातही मावळ्यांना प्रेरणा देवून स्वराज्यासाठी असंख्य मावळे तयार केले. असे मत त्यांनी मांडले तारदाळ येथे ग्राम रत्न पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत चौगुले ( सि ए ) प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, विशाल कुंभार,दिलीप शेंडे, प्रसाद कुलकर्णी, श्रीकृष्ण दरेकर, अंजना शिंदे, यशवंत वाणी, यासीन मुजावर, राणी शिंदे, के जी पाटील, प्रकाश खोबरे, प्रविण पाटील, सजंय चोपडे, गजानन नलगे, चंद्रकांत तांबवे, भाऊसो चौगुले, विमल पोवार यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन खोत यांनी केले. मनोगतातून डि पी भगत यांनी वीष वर्षाचा प्रवास विशद केला. सुत्रसंचालन विश्वनाथ मांजरे व विशाल देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन दिलीप खोत गजानन खोत व सर्व सदस्यांनी केले













