August 3, 2026 9:08 pm

श्री देवी इंदुमती या ऐतिहासिक बोर्डिंग चा 107 वा वर्धापन दिन उत्साहात.

लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

दिप प्रज्वलन करताना संस्थेचे चेअरमन
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072
जाहिरात व पुरस्कारासाठी संपर्क 7276756577

कोल्हापूर -श्री देवी इंदुमती वोर्डिंग, सिसनं ६५७ सी वॉर्ड,रविवार पेठ,येथील छ.राजर्षी शाहू महाराजांनी दि.१ जानेवारी १९१९ रोजी गोरगरीव मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतुने, कक्कय्या समाजाचे थोर नेते गंगाधर य.पोळ व चर्मकार समाजाचे दत्तोवा पोवार यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या ऐतिहासिक श्री देवी इंदुमती बोडिंगचा ऐतिहासिक बोर्डिंगचा १०७ वा वर्धापन दिन संस्थेचे चेअरमन गणेश नारायणकर यांच्या अध्यक्ष ते खाली व संचालक मंडळा च्या उपस्थितित नुकताच झाला.या प्रसंगी देवस्थान मंडळाचे सचिव मा.शिवराज वं.नाईकवाडे, यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलीत करून उत्साहात साजरा केला.यावेळी सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक, दिपक जाधव व भरत जाधव यांच्या वतीने प्रकाश जाधव हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच माधुरी बेकरीचे संचालक, सुर्यकांत वडगावकर, युवराज ट्रेडर्स चे, युवराज सोनवणे, राष्ट्रीय लेदर वर्क्सचे, राजन सातपुते, ॲड.पराग राणे, स.क.जि.प.माजी निरिक्षक राजेंद्र इनामदार, रविंद्र गाट मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका,श्री साई हायस्कूलच्या श्रीमती.मनिषा पाटील, मा.नानासो गायकवाड, अनिल जाधव, सुधाकर विणकरे, मिलिंद कांबळे इत्यादींचा संस्थेच्या वतीने सत्कार केला कार्यकमास सर्व संचालक मंडळ हजर होते यावेळी सर्वानी संस्थेच्या वाटचाली वावत समाधान व्यक्त करून वेळोवेळी संस्थेस लागेल ती मदत करण्याचे अभिवचन देऊन, वसतिगृहातील मुलांना आशिर्वाद दिले. कार्यकमाचे सुत्रसंचलन व आभार अधिक्षक राजाराम कांबळे सर यांनी केले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!