April 18, 2026 12:47 am

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा तसेच विज्ञानाची कास धरावी

माननीय आनंदराव पाटील (चुयेकर) इंग्लिश मीडियम चुये तालुका करवीर येथे  संस्थांतर्गत विज्ञान प्रदर्शन संपन्न.

चुये लोकहिरा न्यूज प्रतिनिधी

जाहिराती साठी संपर्क 7276756577

‘       या विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री एस एच पी हायस्कूल व माननीय आनंदराव पाटील चुयेकर इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.  या प्रदर्शनास च्या मांडणी संदर्भात विज्ञान शिक्षक मारुती पाटील येवतीकर , जाधव सर ,सौ.कुंभार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले  प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था सचिव सौ तेजस्विनी शशिकांत पाटील यांनी केले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये भोगावती महाविद्यालयाचे प्राध्यापक मानसिंग पाटील व प्राध्यापक राकेश शेटे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा ,विज्ञानाची कास धरून मानवी जीवन सुखकर समृद्ध कसे होईल या दृष्टीने नवनवीन शोध लावण्याच्या कामी आपणही लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायला हवा अंधश्रद्धेला थारा देऊ नये अशा प्रकारचे मनोगत प्राध्यापक मानसिंग पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्था सचिव सौ तेजस्विनी शशिकांत पाटील यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. श्री एस एच पी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पी आर कांबळे सर यांनी आपल्या भाषणात वेगवेगळे दाखले देत  छोट्या छोट्या प्रसंगातून शोध कसे लागतात याचे विवेचन केले. यावेळी निवास पाटील सर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली . सौअश्विनी पाटील मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सौ चौगले मॅडम यांनी आभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!