April 17, 2026 9:57 pm

वीरशैव कक्कया समाज विकास मंडळ मार्फत भव्य वधुवर मेळावा चे, तसेच स्नेह सम्मेलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, विशेष प्राविण्य सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार या विविध कार्यक्रमाचे आयोजन.

पुणे येथील (लोकहिरा वृत्तसेवा) वीरशैव कक्कया समाज विकास मंडळ मार्फत भव्य वधुवर मेळावा चे, तसेच स्नेह सम्मेलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, विशेष प्राविण्य सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार या विविध कार्यक्रमाचे आयोजन. करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 09/11/2025 रोजी पुणे येथे गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री मा.श्री. सुशिलकुमारजी शिंदे (मा. गृहमंत्री भारत सरकार) मा.श्री. ज्ञानराज चौगुले (मा. आमदार, उमरगा-लोहरा) मा. श्री. विजय इंगळे (उपाध्यक्ष भा.ज.पा., अनुसूचित जाती मोर्चा, मुंबई) मा. ना. श्री. मुरलीधर मोहोळ (सहकार व नागरी हवाई राज्यमंत्री, भारत सरकार) मा.श्री. विनोद कावळे (IAS) (सचिव एक्ससाईस, मिझोराम) मा. श्री. प्रशांत व्हटकर (मुख्याधिकारी, कऱ्हाड) मा.कु. प्रणितीताई शिंदे (खासदार, सोलापूर) मा.श्री. अशोककुमार मुनोळी (IAS.से. नि.) (मा. अतिरिक्त मुख्य सचिव, कर्नाटक) मा. श्री. निवृत्ती सावळकर (अध्यक्ष अखिल भारतीय समस्त कक्कय्या महासंघ, मुंबई), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. निमंत्रण /कार्यक्रम पत्रिका सोबत जोडली आहे. तरी सर्व समाज बंधू भगिनीना नम्र विनंती करण्यात येते की समाज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची व विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्याची नावे मंडळास कळविण्यात यावीत. तसेच सदरचे पत्रक आपल्याकडील असलेल्या सर्व समाज्याच्या ग्रूप वर शेअर करावे. सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमा साठी बहुसंख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन मंडळाचे अध्यक्ष हनुमंतराव सोनवणे व सर्व कार्यकारी मंडळ,पुणे यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!