



मुंबई चेंबूर येथील लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :- अंबादास कटके
– डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सर्व पक्षांचे आमदार, खासदार तसेच विविध सामाजिक संघटनांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला आंबेडकर घराण्याचे वंशज आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते श्री. सुजात दादा आंबेडकर हेही उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते समारोप समर्पण सोहळा पार पडला.
समाजसेवक जोगेंद्र कवाडे यांनी ही या कार्यक्रमाला उपस्थित राहुन बाबासाहेबांनी सर्व समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. त्यांनी सामाजिक समतेच्या दिशेने बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाची जाणीव करून देत, आजही त्या मूल्यांनुसार समाजाच्या प्रगतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान एक किरकोळ अचानक घटना घडली. सुजात दादा आंबेडकर यांना कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी काही क्षण विलंब झाला असता, त्याच वेळी अनिल देसाई, तुकाराम काते आणि काँग्रेस पक्षाचे नेते चंद्रकांत हंडोरे हे तीनही मान्यवर लिफ्टरमध्ये उपस्थित होते. सुजात दादा कार्यक्रम स्थळी पोहोचताच, उपस्थित नागरिकांकडून बाबासाहेबांच्या वंशजांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्याची जोरदार मागणी झाली.
जनतेच्या भावना पाहून आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन, आधीच पुष्पहार हातात असलेल्या तिघाही नेत्यांनी मोठेपणा दाखवत तो पुष्पहार. सुजात दादा आंबेडकर यांच्या हस्ते अर्पण होण्यासाठी विनम्रपणे पुढे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण, समाजातील ऐक्य आणि समतेच्या मूल्यांची जाण करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत शांत, सुसंस्कृत आणि भावपुर्ण वातावरणात पार पडला.













