लोकहिरा न्यूज वृत्तसेवा:-




कोल्हापूर : डॉ आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था व जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने बालविवाहमुक्त भारत मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा स्तरावरील एकदिवसीय चर्चासत्र दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी (CSIBER) कॉलेज, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विविध विभागांचे अधिकारी, संस्था प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात अतिथींचे स्वागत आणि सहआयोजकांची ओळख आनंदा कांबळे यांनी करून आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक निता आवळे व अमोल कदम यांनी केले
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मा.स्वाती यादव (सहा.पोलिस निरीक्षक ) तसेच अंगणवाडी सेविका आक्काताई आकीवाटे,सुवर्णा कांबळे अंगणवाडी सेविका तसेच अध्यक्ष मा.डॉ दिपक भोसले सर यांच्या हस्ते झाले सामाजिक, कायदेशीर आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून बालविवाह निर्मूलनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन झाले.यामध्ये मा.स्वाती यादव (सहा.पोलीस निरीक्षक) सत्र १ मध्ये बालविवाहाची सद्यस्थिती, त्यामागील आर्थिक, सामाजिक आणि मानसिक कारणे, तसेच उपलब्ध सहाय्यव्यवस्थांवर सखोल चर्चा झाली. संस्थेचे संस्थापक ललित बाबर सर नीलम धनवडे महेंद्र कांबळे
या सत्रात ASVSS प्रमुख, जिल्हा महिला व बालविकास यंत्रणेचे अधिकारी, वन स्टॉप सेंटरचे प्रतिनिधी, बालसंरक्षण समिती, तसेच किशोर-किशोरी गटांचे मार्गदर्शक यांनी आपली मते मांडली.कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह निर्मूलनासाठी प्रत्येक विभागाने कोणती पावले उचलायची याबाबत ठोस कार्ययोजना आखण्यात आली.जिल्ह्यातून बालविवाह पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी सर्व विभागांचे समन्वयाने प्रयत्न आवश्यक असल्याचा निर्धार या चर्चासत्रातून व्यक्त झाला.
बालविवाहमुक्त कोल्हापूर जिल्हा बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा प्रतीक्षा बुचडे यांनी घेतली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता आवळे यांनी केले तर आभार समीक्षा कोळी यांनी मानले
या चर्चा सत्रास संस्थेचे माधुरी कांबळे, आरिफ पानारी,गीता पाखरे शर्मिला कांबळे, आयेशा पटेल,शैला कुरणे,मुस्तफा शिकलगार,बिसमिल्ला जमादार,सायली मोरे तसेच सायबर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते.













