🔻 ” सेतू बांधा रे …… बांधा रे सागरी ….”
🔸 कक्कय्या ढोर समाज आणि सद्यःस्थिती


🔺
***
🔹 लोकहिरा न्यूज प्रतिनिधी कक्कय्या ढोर
🔸 अनुसूचित जाती प्रवर्गातील यादी क्र.१८ वर : ढोर, कक्कय्या, कंक्कय्या व डोहोर या चार नावाने उल्लेखित आहे.
तरी ही ९५ टक्के पेक्षा जास्त लोकांचा धर्म हिंदू व जात ढोर अशी नोंद आहे.
***
या.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जातीचे उपवर्गीकरण / अंतर्गत आरक्षण,जातीची लोकसंख्या आणि वंचित लाभार्थी या दोन्ही निकषावर केली तर ….
ढोर ही जात अत्यल्प लोकसंख्या असल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातील १३ टक्के आरक्षणा पैकी १ टक्के पेक्षा कमी वाटा येईल.
***
१३ टक्के आरक्षणात अनुसूचित जाती पैकी आता पर्यंत जास्त लाभार्थी असलेली जात ढोर ( ७६ टक्के लाभ )घेतलेली जात आहे असे “बारटी” च्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
त्यामुळे अनुसूचित जातीतील अजून ही वंचित आहेत अशा जातीत ढोर ही पुढारलेली जात आहे या गृहितावर अंतर्गत आरक्षणात ही ढोर जातीला १३ टक्के आरक्षणात १ टक्के पेक्षा कमी आरक्षण दिले जाईल.
***
एकंदरीत लोकसंख्या व लाभार्थी म्हणून अनुसूचित जाती उपवर्गीकरणात ढोर जातीला आरक्षणाचा लाभ असून नसल्यासारखे होण्याची शक्यता आहे.
***
सामाजिक पातळीवर ढोर ही जात पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींपैकी व अत्यल्प आहे.ढोर जातीचा पारंपरिक व उपजिविकेचा ” कातडे कमविणे ” हा मुख्य धंदा (मृत अवस्थेत ) बंद झाल्यात जमा आहे.
आज ढोर जात कागदोपत्री जीवंत आहे.
१२ व्या शतकात होऊन गेलेल्या शरण डोहर कक्कय्या या महापुरुषांच्या नावाने मोठेपणा मिरवणाऱ्या ” ढोर ” जातीचे लोक स्वतःला ” वीरशैव कक्कय्या समाजाचे ” असे म्हणतात व त्या नावाने ढोर समाजातील संघटना ही कार्यरत आहेत.
मुळात ढोर जातीतील बहुतेकांना विशेषतः उच्चभ्रू, सुशिक्षित व म्होरके म्हणवणाऱ्या लोकांना ही ” शरण डोहर कक्कय्या” यांचा इतिहास, माहिती ही नाही .” वीरशैव ” व ” लिंगायत ” यातील फरक किंवा अभ्यास नाही.
***
स्वातंत्र्य संग्रामात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच ढोर जातीचे स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि सर्व व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळीत ढोर समाजातील लोकांनी ,फारसा सहभाग घेतला आहे असे दिसत नाही.भारतीय सैन्यात ढोर समाजातील लोक अभावानेच आढळतात.
परिवर्तनाची वा आंबेडकरी विचारधारा यांच्याशी संपर्क साधला अशी मंडळी नसल्यात जमा आहेत.
***
काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधीमुळे स्वातंत्र्य पूर्व काळापासून आज पर्यंत ढोर समाजातील लोकांची नगरसेवक, आमदार, खासदार, राज्यपाल, मंत्री, मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे.परंतु अत्यल्प लोकसंख्या असलेला व राजकीय व सामाजिक दबाब गट , नेतृत्व नसलेल्या ढोर जातीला या पुढे राजकारण वाव मिळेल असे दिसत नाही. आज कोणत्याही गावात,शहरात ,( मुंबई धारावी अपवाद) स्वबळावर ढोर समाजातील कोणी ही लोकं प्रतिनिधी म्हणून निवडून येईल असे दाखवता येत नाही.
***
🔹 संविधानाने दिलेल्या १३ टक्के आरक्षणात म्हटलं तर आज आपला ही संपूर्ण वाटा आहे.
राजकीय आरक्षण हे दर १० वर्षांनंतर संसदेत मंजूर करून वाढवले जाते. त्यात राजकीय पक्ष वा दबाव गट म्हणून ढोर समाजाचा हक्काचे काही ही मोल नाही.
****
🔸१ मे २०२६ स्वयं गणना व १६ मे २०२६ पासून जनगणनेची नोंद सुरू झाली आहे . सध्या ही घर गणना असून खरी जात गणना,जन गणना साधारणपणे फेब्रुवारी २०२७ नंतर सुरू होईल असा कयास आहे.
***
🔹कळीचा मुद्दा: येणाऱ्या जात व जनगण नेच्या वेळी
ढोर समाजातील लोकांनी आपला धर्म व जात याची नोंद काय करावी असा आहे.
पूर्वापार पद्धतीनुसार, परंपरेने चालत आलेली धर्म हिंदू जात ढोर/ कक्कय्या/ कंक्कय्या/ डोहोर ( गॅझेट मध्ये डोहर ऐवजी डोहोर छापले आहे.) पैकी एक नोंदवावी
की
आपण शरण डोहर कक्कय्याचे वंशज व जाती बांधव आहोत म्हणून सर्व ढोर समाजातील लोकांनी
धर्म लिंगायत जात ढोर/ कक्कय्या/कंक्कय्या/डोहोर ( पैकी एक) नोंदवावी असा विचार विनिमय चालू आहे.
****
अनुसूचित जातीच्या आधारावर आरक्षणाचा लाभ हिंदू,शिख, बौद्ध धर्मातील जातीला मिळतो.
परंतु ढोर समाजातील लोक धर्म बौद्ध लिहिण्याच्या मानसिकतेत नाहीत हे सत्य आहे.
***
अंतर्गत आरक्षणात अत्यल्प लोकसंख्या असलेला व अनुसूचित जातीत पुढारलेला समाज म्हणून अ जा सुची क्र.१८ मधील ” ढोर” जातीला यापुढे आरक्षणात हक्काचा वाटा रहाणार नाही असे चित्र आहे.
🔹 म्हणून सगळ्या ढोर समाजातील लोकांनी ” अंतर्गत आरक्षण धोरणास विरोध केला पाहिजे.कारण हे धोरण ढोर समाजाला नेस्तनाबूत करेल.
****
जर अंतर्गत आरक्षण मुळे सवलती व आरक्षण मिळणार नसेल तर कागदोपत्री आपण हिंदू – ढोर या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींपैकी म्हणून आपले व जातीचे अवमूल्यन का करावे ? अशी एक विचार धारा निर्माण होत आहे.
****
आपल्या नव्या पिढीला जातीचे काही देणे घेणे राहिले नाही.आपले सर्वच लोक आता ढोर जात न सांगता आम्ही ” वीरशैव कक्कय्या ” जातीचे आहोत असे सांगत असतात.आम्ही वरच्या जातीचे अशी मानसिकता ठेवून आहेत.
🔻 म्हणून येणाऱ्या जात जनगणनेत सर्व ढोर समाजातील लोकांनी आपला धर्म लिंगायत व जात कक्कय्या अशी नोंद करून घ्यावी हा मत प्रवाह जोर धरत आहे.अशी नोंद केली केली तर आपल्यातील व पुढील पिढ्यांतील न्युनगंड जाईल.एव्हीतेव्ही ढोर ही जात पुढारलेली आहे.त्यांना सवलतीची गर ज नाही या कारणामुळे शासनाकडून कुचंबना करून घेण्यापेक्षा आपणच सन्मानाने
धर्म लिंगायत व जात कक्कय्या लावावी असे म्हणणारे लोक या मताला दुजोरा देतील याची खात्री आहे.
आरक्षण हे धर्मावर नसून जातीवर आधारित असल्याने बौद्ध झालेल्याना ही मिळत आहे.त्यामुळे आपण लिंगायत धर्म लिहिले तरी जातीमुळे लाभार्थी राहाणार आहोत.
स्वातंत्र्य लिंगायत धर्माला मान्यता मिळाली तर लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने आपण त्यांच्यात समाविष्ट झालो तर त्याचा लाभ कक्कय्या ढोर समाजातील लोकांना निश्चित मिळेल.
🔸 अंतर्गत आरक्षण लागू होण्यापूर्वी व जात जनगणना नोंदीच्या वेळी कक्कय्या ढोर समाजातील सर्व गाव,शहरे, विभागातील सर्व घटक, संघटनानी या विषयावर सविस्तर चर्चा सत्र ठेवून एकजुटीने समाज उन्नतीसाठी एकत्र यावे.🔸
सदर विषयावर आणखी काही चर्चा व माहिती बाबत मी स्वतः पुढाकार घेऊन जेथे बैठक, चर्चा सत्र ठेवले जाईल तेथे उपस्थित राहीन.
या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा पातळीवरील प्रमुख लोकांची एक समन्वय समिती नेमण्यात यावी म्हणजे लोक जागरण व विचार मंथन होईल.
आपल्या कक्कय्या ढोर समाजातील अनेक समविचारी समाज बांधवांशी केलेल्या चर्चेतून व्यक्त झालेली भूमिका मी या लेखाद्वारे मांडली आहे
🙏 ना.म.शिंदे
🔸🔹🙏🔸🔹













