April 17, 2026 7:53 pm

महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135 वी जयंती उत्साहात संपन्न.

कोल्हापूर : येथील (लोकहिरा न्यूज वृतसेवा)

कोल्हापूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली, ज्यामुळे वातावरणात शांतता आणि सामाजिक समतेचा संदेश घुमला. यानंतर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष निवास नलवडे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी फुले-आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करून समाज प्रबोधनाचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमात संविधान विचारमंच, कोल्हापूर महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण होणार असून, नगरसेवक व पत्रकारांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मा. रिंकू देसाई (नगरसेवक), उपाध्यक्ष बाळासाहेब रावळ, खजिनदार सदाशिव पुंडे, संचालक प्रकाश आमते, जयवंत बुटके, सदाशिव कुंभार, वसंत पाटोळे, राजाराम खोंद्रे, दत्ता कांबळे, राजाराम सूर्यवंशी, अण्णाप्पा कांबळे, अशोक रुईकर, श्रीकांत भोसले, रमाकांत बुद्धीसागर, अशोक देसाई, प्रा. आनंदा कांबळे, विनोद कांबळे, गणपती शिंदे (साप्ताहिक लोकहिरा न्यूज), ॲड. वसंत कांबळे, प्रा. दिनकर पाटील, पांडुरंग पोब्रेकर, निरंजना बुद्धीसागर, सुरेखा आंबेकर, ॲड. उर्मिला बुद्धीसागर, राजू जाधव (सामाजिक कार्यकर्ते), शांता नाईक, प्रा. राम वाकरेकर, सतीश कुमार शिंगे, संजय कांबळे, लोकेश शिंदे, अवनि संस्थेचे त्रिवेणी देवकर ,पिंटू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात समता, शिक्षण आणि बंधुभावाचे मूल्य अधिक दृढ होत असून, तरुण पिढीसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरत आहे. फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले.

1 thought on “महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135 वी जयंती उत्साहात संपन्न.”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!