April 17, 2026 7:52 pm

शिखर शिंगणापूर यात्रा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न.

शिखर शिंगणापूर यात्रा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न.

Oplus_131072

शिखर शिंगणापूर येथील (लोकहिरा न्यूज वृत्तसेवा)

वीरशैव कक्कया कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने 48 वर्षाची परंपरा राखत बोलाबाई मठ येथे चैत्र कामदा एकादशी निमित्त फराळ आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.सोमवार दिनांक 30 मार्च रोजी बारस निमित्त ही महाप्रसादाची वाटप मोठ्या संख्येने करण्यात आले. तसेच विश्रांती ची सोय म्हणून 200 लोकांची व्यवस्था मठा मधील वस्तीमध्ये टॉयलेट व बाथरूम ची व्यवस्था करण्यात आली. यावेळी शिखर शिंगणापूरच्या जत्रेतच दर तीन वर्षानी वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई. यांची पदाधिकारी व सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा ही आयोजित केली जाते. या विशेष सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षा करीता 2029 साला पर्यंतच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने अध्यक्ष. महादेव कृष्णा शिंदे, कार्याध्यक्ष. सुरेश दत्तात्रय शिंदे, उपाध्यक्ष. विश्वनाथ सिताराम शिंदे, उपाध्यक्ष. विजय शिंदे, सचिव.यशवंत बसवंत नारायणकर, सहसचिव. किशोर खाटीकमारे, उपसचिव. नंदादीप रमाकांत शिंदे, खजिनदार. मारुती ईश्वर खंदारे, उपखजिनदार. बबनराव चंद्रकांत सोनवणे, प्रवक्ता. रवींद्र रूपचंद शिंदे,अंतर्गत हिशोब तपासणी. विजय धर्मा पोळ,व्यवस्थापक. तानाजी खंदारे,अशोक खंदारे, राजू खंदारे, अशा नवीन पदाधिकारी यांची निवड करून पुढील कार्यास शुभेच्छा. मंडळाच्या वतीने व भाविकांच्या वतीने देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा वेळी मुंबईचे समाज बांधव संपादक दत्तात्रय श्रावण खंदारे यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक भगवे वादळ ची पहिली छापील वृत्तपत्रिका शंभू महादेव चरणी शुभ आशीर्वादासाठी देण्यात आले.आणि समाज बांधवांच्या हस्ते पत्रिकेचे वितरण करण्यात आले.मंडळाच्या भेटीसाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून मंडळास शुभेच्छा दिल्या. तर संभाजीनगरचे पोलीस सहाय्यक आयुक्त राजकुमार गणपतराव सोनवणे यांनी ही उपस्थिती राहुन मटाची व्यवस्था, भंडार्याची देखरेख, टॉयलेट बाथरूमची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. पाहून आनंद व्यक्त केला. मंडळांनी केलेल्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. तर नवीन तीन गुंठे जागेच्या ठिकाणी पाहणी करीत बोर असल्याची खात्री केली. रस्ता आणि जुन्या मठ्ठा चे अंतर अवघे 50 पावलावर असल्याची ही खात्री केली. या जागेवर नवीन विश्रांती ग्रह बांधण्याचा मंडळाच्या प्रस्तावाला सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. हे कार्य करीत असताना सर्व देणगीदार आणि समाज गौरव पुरस्काराचे मानकरी यांचे हि अभिनंदन करून सर्वांना धन्यवाद देण्यात आले. असे सहकार्य पुढेही मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी समाज बांधव,मंडळाचे सभासद व असंख्य भावीक उपस्थित होते.

1 thought on “शिखर शिंगणापूर यात्रा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न.”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!