August 3, 2026 5:45 pm

वडगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत चोर जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस

लोकहिरा न्यूज प्रतिनधी-‌ नारायण कांबळे

कोल्हापूर : वडगाव पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा दुचाकी जप्त केली. या कारवाईमुळे चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून संशयित विशाल संभाजी पवार (वय २७, रा. उमराणी, ता. जत, जि. सांगली) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची होंडा मोटारसायकल जप्त केली.
या कारवाईमुळे वडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस निरीक्षक विजय घेरडे व गुन्हे शोध पथकातील ‌आसिफ कलायगार,शरद मेनकर, शेखर कदम, स्वाती कांबळे, एकनाथ गावंडे यांनी केले पुढील तपास सुरू आहे.

-1

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!