April 17, 2026 7:53 pm

देशभक्त रत्नाप्पाण्णांच्या समोर 32 वर्षांपूर्वी सादर केलेल्या स्फूर्ती गीतास, दिला नवीन उजाळा .

लोकहिरा न्यूज वृतसेवा

धन्य धन्य रत्नाप्पा आण्णा, परिचित सर्वांना!
वर्णितो तुमची हिम्मत आणि देशभक्ती!
नसानसातून भिनवली प्रतिकारशक्ती!
भारत भूमी रक्षणासाठी, पाठीवर झेलली लाठी,
गोऱ्यांना चकवण्यासाठी डोईवर शेणाची पाटी
अनं कमरेला लंगोटी,
तरुणपणी आण्णा केली तुम्ही कमाल, उडवली धमाल!
पारतंत्र्याची तोडली बेडी, स्वातंत्र्याची उभारली गुढी!
सहकाराचा मंत्र धरुनी, पंचगंगेची केली उभारणी!
थोर कल्पना मणी धरूनी, उभी केली कोल्हापूर जिल्हा सूतगिरणी!
रत्नाप्पा आण्णा तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला!
रत्न चमकते खरोखरी, आदरभाव घरोघरी!
स्त्रिया गाती गीत जात्यावरी, खंजिरे यांच्या पुण्यतिथी दिनी!
अमृता भोसले पैलवान गुणी, पंचगंगेवर दत्तक पैलवान घेतला रत्नाप्पा आण्णांनी!
जो असे गरिबांचा वाली, त्याला परमेश्वर उदंड आयुष्य घाली!
मुखातून सत्य शब्द ओतूनी, बाळासाहेब मोहिते वंदितो!
धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!