August 6, 2026 12:52 pm

जातीय राजकारणाला फाटा; सर्व समाजातील दिव्यांगांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष – आ. बच्चू कडू

जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांचा सत्कार करताना घुडूबाई

शिव-भीम महोत्सव २०२६ ला अभूतपूर्व प्रतिसाद; आयोजक विकास गायकवाड यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक.

लोकहिरा न्यूज | प्रतिनिधी : राजू टिळंगे | तारदाळ

शिव भीम महोत्सवातील काही क्षणचित्रे
फोटोस अभिवादन

बच्चुभाऊ कडू मार्गदर्शन करीत असताना
प्रसाद खोबरे मनोगत व्यक्त करीत असताना
शिव भीम महोत्सवातील काही क्षणचित्रे
शिव भीम महोत्सवातील काही क्षणचित्रे

तारदाळ येथे आयोजित शिव-भीम महोत्सव २०२६ हा सामाजिक समता, बंधुता आणि दिव्यांग सक्षमीकरणाचा भव्य सोहळा ठरला. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी आपल्या परखड भाषणातून जातीय राजकारणावर जोरदार प्रहार करत, सर्व समाजातील दिव्यांग, वंचित आणि गरजू नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटना अखंडपणे संघर्ष करत असल्याची ठाम भूमिका मांडली. त्यांच्या प्रत्येक विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आ. बच्चू कडू म्हणाले, “जात-पात आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे राजकारण आम्हाला मान्य नाही. आमचा संघर्ष हा प्रत्येक दिव्यांग, वंचित आणि गरजू नागरिकाच्या हक्कांसाठी आहे. त्यांना न्याय, सन्मान आणि समान संधी मिळवून देण्यासाठी प्रहार संघटना शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील.”
दिव्यांगांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार मिळावा, यासाठी शासनाने अधिक संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दिव्यांगांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भविष्यात आणखी व्यापक जनआंदोलने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी समाजात जात, धर्म आणि पंथ यांच्या नावावर मतभेद निर्माण करण्याऐवजी सामाजिक सलोखा, समता आणि बंधुभाव जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या भव्य शिव-भीम महोत्सवाचे मुख्य आयोजक विकास गायकवाड यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाची आखणी केली. विविध समाजघटकांना एकाच व्यासपीठावर आणत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, मान्यवरांचे स्वागत, दिव्यांग प्रश्नांबाबतची त्यांची सातत्यपूर्ण तळमळ आणि सामाजिक बांधिलकी यामुळे उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले. शिव-भीम महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी संदेश देण्यात विकास गायकवाड यांचे योगदान विशेष ठरले.
कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक आयोजक विकास गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन गणपती शिंदे यांनी केले, तर सचिन पोंवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, महेश बडे, समाधान हेगडकर, सुनील शिंदे, शहाबुद्दीन घुडूभाई, नारायण हुपरीकर, प्रल्हाद माने, राजू टिळंगे, नजीर नदाफ, प्रकाश कांबळे, दगडू कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, नवनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, बाळू कराळे यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिव-भीम महोत्सव २०२६ हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम न ठरता सामाजिक समता, बंधुता, संविधानिक मूल्ये आणि दिव्यांग हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक सोहळा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!