साप्ताहिक लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:- अभयकुमार नेर्लेकर
————————–
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले नुकतेच कोल्हापूरात आले होते. या औचित्यानं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने सोमवार दि.१९आँक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीक आघाडीचेवतीने बैठक आयोजित केली होती. प्रारंभी कँप्टन दामले यांच्या हस्ते श्री परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी यांनी कॅ.आशिष दामले यांचं स्वागत आणि सत्कार केला. बैठकीत बोलताना कॅप्टन दामले यांनी श्री महालक्ष्मीचे आशिर्वाद आणि कोल्हापूरच्या जिव्हाळंयापोटी करवीरात नियमित येणं होतं असतं ,हे नमूद केलं. महामंडळामार्फत प्रगतीपथावर असलेल्या ब्राम्हण समाजाच्या विकासाच्या उपक्रमाची विस्तृत माहिती देवून समाजात पूजापाठ,पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हण ज्ञातीसाठी उद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबाबत निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला. महामंडळाकडील उपक्रमांचे फायदे घेवून तरुणवर्गाने आपल्या बुध्दीच्या जोरावर प्रयत्न करावेत, नवीन व्यवसाय सुरू करावेत, नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे बनून समाजापुढे आदर्श ठेवण्याचे आवाहन केले. आवश्यकतेनुसार लागणार्म सहकार्यासाठी महामंडळ आपल्या बरोबर असल्याची ग्वाही दिली. यावेळी मठमंदिर आघाडीचे प्रदेश अध्यक्ष के. रामाराव यांचे हस्ते कॅ.दामले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सभासदांनी काही प्रस्ताव मांडले. ब्राम्हण महासंघाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे कार्याध्यक्ष अभयकुमार नेर्लेकर यांनी या बैठकीचं आयोजन केले होते..या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष गुरूप्रसाद कुलकर्णी, श्रीधर कुलकर्णी, हरिष शिंदे,अशोक पोतनीस, प्रमोदिनी हर्डीकर,आदित्य मैंदर्गीकर, प्रशांत जोशी,मिलिंद पावनगडकर, श्रीकांत लिमये ,सचिन जनवाडकर, विनय कुलकर्णी, विश्वनाथ देशपांडे, विजय जोशी,तसेच आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे विनायक कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, केदार वाघापूरकर, सचिन जिल्हेदार इत्यादी पदाधीकारी व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार यशवंत म्हसकर यांनी केले.
—————————







