October 28, 2026 6:12 am

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवाळी भेटवाटप उत्साहात

पाच लिटर सूर्यफूल तेल देऊन सभासदांचा आनंद द्विगुणित

कोल्हापूर, लोकहिरा न्यूज वृत्तसेवा :

दिवाळीचा सण म्हणजे .आनंद, उत्साह आणि आपुलकीची देवाणघेवाण. याच भावनेतून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी पाच लिटर सूर्यफूल तेलाची भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

संस्थेचे चेअरमन मा. विलास बुचडे, व्हाईस चेअरमन सौ. सविता पाटील आणि संस्थापक चेअरमन मा. अशोकराव तोरस्कर यांच्या हस्ते सभासदांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

दिवाळीच्या सणात दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट म्हणून मिळाल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे संस्थेचे सभासदांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. सणासुदीच्या काळात सभासदांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरला.

यावेळी संस्थेचे संचालक मा. विजयराव भोसले, बाळासाहेब गुरव, अशोक साठे, विजय यादव, उत्तम बिराजे, संजय पाटील, रमेश पाटील, सागर पाटील, शामराव माने, व्यवस्थापक धनाजी चौगले, युवराज बिडकर यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.

सभासदांच्या आनंदात सहभागी होत दिवाळी भेटवस्तूंचे वाटप उत्साहात पार पडले. या उपक्रमातून संस्थेच्या सभासदांप्रती असलेल्या आपुलकीची आणि सहकार्याच्या भावनेची प्रचिती आली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!