August 3, 2026 8:17 pm

कुस्तीच्या मैदानावरील लाल मातीच्या वादातून तामगावात रक्तरंजित संघर्ष; तलवारीच्या हल्ल्यात तिघे जखमी.

8 मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिना निमित् जाहिरात व पुरस्कारा साठी संपर्क 7276756577

Oplus_131072

तामगाव (ता. करवीर) लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:- संभाजी चौगुले

येथे कुस्तीच्या मैदानावरील लाल माती नेण्याच्या किरकोळ वादातून तामगाव येथे एका कुटुंबाकडून तलवारीने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या वाहनांची जाळपोळ केल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुस्तीचा आखाडा तयार करण्यासाठी लाल माती टाकण्यात आली होती. ही माती काही मुले रिक्षामधून घेऊन जात असताना संबंधितांनी त्यांना मज्जाव केला. या वादातून परिस्थिती चिघळली आणि काही वेळातच मुख्य आरोपी घटनास्थळी दाखल झाला. त्याने शिवीगाळ व धमकावणी करत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या दोन्ही हातांच्या तळव्यांना गंभीर इजा झाली. मदतीसाठी धावून आलेला आणखी एक जणही गंभीर जखमी झाला, तर तिसऱ्या व्यक्तीस किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. संतप्त जमावाने आरोपींच्या घरावर दगडफेक करत घरासमोर उभी असलेली दुचाकी व टेम्पो पेटवून दिला. त्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या दोन मुलांना शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. सध्या गावात शांतता असून गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!