August 3, 2026 7:33 pm

चुये तालुका करवीर येथे दहावी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न .

श्री .एस. एच. पी .हायस्कूल व माननीय आनंदरावजी पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेज चुये तालुका  करवीर येथे दहावी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न .

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:-

मुख्याध्यापक पीआर कांबळे सर प्रास्ताविक व स्वागत करीत असताना
लोकहिरा आपणास जाहिराती साठी व पुरस्कारा साठी अवाहन करीत आहे. संपर्क 7276756577

Oplus_131072

 

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव सौ तेजस्विनी शशिकांत पाटील वहिनी होत्या. आपल्या शुभेच्छा पर भाषणामध्ये त्या म्हणाल्या सर्व विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यामध्ये चांगले शिक्षण घेऊन गावाचे, आपल्या आई-वडिलांचे व शाळेचे नाव मोठे करावे. आपल्या आई-वडिलांचा सन्मान  वाढेल आपल्या गुरुजनांचा सन्मान वाढेल अशा प्रकारची वर्तणूक समाजामध्ये करून समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो यानुसार आपण भविष्यामध्ये उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याची भूमिका ठेवावी असे प्रतिपादन यावेळी आपल्या भाषणांमधून केले.तसेच शाळेचे कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याबद्दलचे आपले मत सौ तेजस्विनी शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक  भाषणात मुख्याध्यापक श्री पी आर कांबळे सर यांनी 

वर्षभर चाललेल्या शाळेतील कार्याचा आढावा घेतला .  सौ एस एस खाटांगळेकर मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मंत्रालयामध्ये एम.पी.एससी मार्फत स्टेनोग्राफर या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कुमारी पूनम दिनकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.आराध्या मगदूम, मयुरी भोसले, प्रतीक्षा मगदूम व दर्शन कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरोही कुमार मगदूम, मृणाली सागर मगदूम आराध्या देवकुळे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला तसेच आनंदराव पाटील चुयेकर इंग्लिश मीडियम ची विद्यार्थिनी आरोही मच्छिंद्र मगदूम हीचा  राज्यस्तरावर क्रीडा विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.कुमारी तनुजा मारुती पाटील, सई सुहास पाटील ,ऋतुजा विठ्ठल देवकुळे गुंजन उत्तम मगदूम या दहावीच्या विद्यार्थ्यांनींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री बी. एन. कुंभार सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यु एस पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर व्ही. एन . बुगडीकट्टीकर  सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!