


लोकहिरा न्युज वृत्तसेवा
करवीर तालुका सावर्डे सडोली दुमाला येथील माध्यमिक विद्यालय सावर्डे सडोली दुमाला च्या 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्र ॲमेच्युअर वुशु असोशिएसन पुणे मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य रेफर आणि जज सेमिनार 2025 मध्ये बी ग्रेड प्राप्त केलेल्या आयुष उत्तम कांबळे यांने संपादन केल्याने त्याचे पालक हर हर महादेव सेवा संस्था सडोलीचे लिपिक कम सचिव; संदीप मारुती कांबळे यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा साहित्याचे व खो,खो क्रीडांगणाचे पूजन करून नववी विरुद्ध दहावी मुलांचा खो-खो सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आयुष कांबळे याचा ही गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची ओळख सांस्कृतिक विभाग प्रमुख सुधाकर केसरकर यांनी केले तर क्रीडाप्रमुख बाजीराव पाटील यांनी विद्यार्थी,विद्यार्थिनीं च्याकडून क्रीडा प्रतिज्ञा व क्रीडा विषयीचे नियम सांगून सामन्यांची सुरुवात उत्साहात केली. खो-खो व कबड्डीचे सामने सुरू करण्या साठी शाळेचे मुख्याध्यापक पी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सुरुवात झाली,या कार्यक्रमात प्रियंका पाटील,पांडुरंग म्हातुगडे,तानाजी म्हातुगडे गणपती शिंदे यांचे सहकार्य लाभले. क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन,जिमखाना प्रमुख विशाल कांबळे यांनी मानले तर आभार मानसी भोसले यांनी मानले.












