



लोकहिरा वृतसेवा
कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खाजगी आराम बसवर आज पहाटे बाराच्या दरम्यान किणी गावचे हद्दीत अनोळखी सात ते आठ अनोळखी इसमाने चाकूचा धाक दाखवून सुमारे एक कोटी 22 लाख रुपये चा धाडसी दरोडा टाकला.
कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खाजगी आराम बस क्र.MH 09 GJ 7272 ही ही रात्री अकराच्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. तावडे हॉटेल या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसल्या. ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनी गावच्या हद्दीतील भुताचा माळ परिसरात आली असता बस मधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याकडेला थांबवली. बसच्या पाठीमागून येणाऱ्या अनोळखी चार ते पाच अनोळखी व्यक्ती बसचा पाठलाग करत येत होती. त्यांनी थांबलेल्या बसमध्ये घुसून
बस मधील सुतळी बारदान मधील 34 किलो वजनाची चांदी,प्लॅस्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे असा सुमारे एक कोटी 22 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना संशयित दरोडेखोरानी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही नाहीतर जिवानिशी मारू अशी धमकी दिल्याने बस पुढे निघून गेली आणि चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर सांगली पोलीसांनी धाव घेतली. सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठ वडगाव
पोलीस ठाण्यात आणण्यात आली. रात्री जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह, वडगाव पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली. आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना केल्या. बसचा चालक आणि क्लीनर यांना ताब्यात घेतले आहे.












