April 18, 2026 9:11 am

कोल्हापूरच्या सायबर चौकात ब्रेक फेल ट्रकचा ‘हाहाकार’; चार वाहनांना धडक, एका चारचाकीचा चक्काचूर!

​कोल्हापूर: येथोल लोकहिरा न्यूज

 

प्रतिनिधी 

​कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात मंगळवार रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरील तब्बल चार वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात एका चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चौकातून वेगात जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्यामुळे ट्रकने समोरील चार वाहनांना एकापाठोपाठ एक धडक दिली. या अपघातात एका चारचाकीसह इतर तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

​अपघाताची भीषणता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. पोलीस ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाची चौकशी करत असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!