April 18, 2026 5:45 am

गोकुळ शिरगाव चोरी प्रकरण उघडकीस; तिघे अटकेत, १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकहिरा न्यूज

जाहिराती साठी संपर्क साधावा
पुरस्कारा साठी लोकहिरा न्यूज आपणास अवाहन करीत आहे इच्छुकांनी संपर्क . साधावा

वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे. गोकुळ शिरगाव परिसरातील केबल चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत १,३२२ मीटर केबल, रिक्षा आणि मोबाईल असा एकूण ₹१,४३,४०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई ८ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली.

गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की चोरी केलेला मुद्देमाल काही व्यक्ती रिक्षामधून हलवण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार उजळाईवाडी परिसरात सापळा लावण्यात आला.

कारवाईदरम्यान तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील

१,३२२ मीटर केबल,

बजाज कंपनीची रिक्षा (एमएच ०९ ईएल ६४६७),विवो कंपनीचा मोबाईल,

असा एकूण ₹१लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपासात चौघांनीही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तू व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने,पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहीत मर्दाने, योगेश गोसावी, राजू कोरे यांनी संयुक्तरीत्या केली.

संपूर्ण कारवाई  पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार, तसेच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!