April 18, 2026 7:33 am

२४ तासांत मोबाईल चोरी व खंडणी प्रकरणाचा तपास उलगडा; दोघांना अटक — हातकणंगले पोलिसांची मोठी कामगिरी

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी दादासो सुतार

हातकणंगले पोलिसांनी मोबाईल चोरीसोबतच जबरदस्तीने ऑनलाईन पैसे मागून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या २४ तासांत ताब्यात घेत ४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास यश मिळवले आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग तपासात उघड झाला असून त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

हातकणगले ते तारदाळ मार्गावरील रेल्वे बोगद्याजवळ फिर्यादी व्यक्तीस अडवून आरोपींनी त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. यानंतर आरोपींनी पीडितास धमकी देत एका मोबाईल नंबरवर ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

पीडिताने घाबरून आपल्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत फोन पे अ‍ॅपद्वारे आरोपींच्या सांगण्यानुसार ₹1,000 रुपये ऑनलाईन पाठवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील मोबाईल फोन हस्तगत केले —VIVO मोबाईल फोन, OPPO मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

रोहन बाबासो कोठावळे, रा. हातकणंगले

आदर्श राजेंद्र काळे, रा. चंदूर, हातकणंगले तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा या गुन्ह्यात सहभाग आढळला असून त्याची ओळख कायदेशीर कारणास्तव गुप्त ठेवण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . तपास पथकात पोलीस निरीक्षक — शरद मेमाणे

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक — विनोद  पिलाणे, पोलीस कॉन्स्टेबल मशकूर मुल्ला विक्रम पाटील,अमित कांबळे,मारुती गावडे, यांचा समावेश आहे. दोन्ही प्रौढ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून खंडणी व मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाणे करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!