April 18, 2026 4:13 am

हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने पोलिसांचे पथसंचलन.

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :- शहाबुद्धीन घुडूभाई

हुपरी नगरपरिषद हुपरीच्या सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थित रित्या पार पडावी त्यासाठी हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले यावेळी हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी नगर परिषद हुपरी सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थित व्हावी या अनुषंगाने हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने पोलीस पद संचालन करण्यात आले हे पद संचालन हे आज दिनांक 30-11-2025 रोजी  हुपरी पोलीस ठाणे हद्दीत  साडेसहा ते सव्वा सात या वेळेत मेन रोड- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- शिवाजीनगर – अपेक्षा कॉर्नर – वाळवेकर नगर,  गल्ली नंबर एक ते दहा – संभाजी माने नगर झोपडपट्टी – होळकर नगर- शाहूनगर  असा रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च करिता हुपरी  पोलीस ठाणे कडील  3 अधिकारी , 12 पोलिस अंमलदार व 36 होमगार्ड  हजर होते . सदर रूट मार्च अधिकारी ,पोलीस अंमलदार व उपस्थित लोकांना सदर रूट मार्चचा उद्देश समजावून सांगितला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!