April 18, 2026 1:35 am

महानगरपालिका निवडणुकीत अडीच हजार दिव्यांगांचा मतदानावर बहिष्कार घालणार.दिव्यांग संघटनेचा इशारा.

इचलकरंजी येथील (लोकहिरा न्यूज प्रतिनिधी)

महानगरपालिका झाल्यापासून गेल्या तीन वर्षात इचलकरंजी शहरातील दिव्यांग बांधवांना तेराशे ते चौदाशे रुपये अशी तुटपुंजी रक्कम देऊन इचलकरंजी महानगरपालिका दिव्यांगांची बोळवण करत आहे.जिथे इचलकरंजी महानगरपालिकेचे उत्पन्न वार्षिक जवळपास 200 कोटीच्या घरात असून देखील दिव्यांगाणा त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी दिला जात नाही.तसेच 2024/25 या वर्षात इचलकरंजी महानगरपालिकेच्या एकूण १९४ कोटी रुपयांच्या स्वउत्पन्नातील ५ टक्के म्हणजे नऊ ते साडेनऊ कोटी रुपयांचा दिव्यांगांसाठीचा निधी द्यावा लागत असून इचलकरंजी महानगरपालिका महिला व बाल विकास कल्याण चा हा खोटा जीआर दाखवून दिव्यांगांची फसवणूक करत आहे.त्यामुळे दिव्यांच्या पाच टक्के निधी मध्ये होत असलेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ शहरातील सुमारे २५०० दिव्यांग बांधवांनी महानगरपालिका मतदान कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला आहे. प्रहार संघटना आणि इचलकरंजी दिव्यांग कृती समितीने दिव्यांग मतदान जनजागृती कार्यक्रमावर बहिष्कार टाकत तीव्र नाराजी व्यक्त केली.दिव्यांग समितीच्या मते,दिव्यांग कल्याणासाठी असलेला ५ टके निधी शासनाच्या जीआरनुसार देने बंधनकारक असतानाही महानगरपालिकेकडून चुकीचा शासन जीआर दाखवून दिव्यांगांची फसवणूक करत आहे.त्यामुळे हक्काचा पाच टक्के निधी न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांचे अत्यावश्यक उपक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे शासन जीआर नुसार दिव्यांगांचा ५ टक्के निधी मंजूर  न झाल्यास व शासन जीआर नुसार वाटप न झाल्यास इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग बांधव तसेच त्यांचे नातेवाईक पै पाहुणे मतदान करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनी इचलकरंजी महानगरपालिका समोर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली.यावेळी प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अध्यक्ष अनिल विजयनगर, इरफान बागवान,अंजना नेतले,इचलकरंजी दिव्यांग कृती समितीचे जीवन पोतदार, दिलीप शिंदे,भाजपा आघाडी अध्यक्ष भानुदास तासगांवे, संभाजी निबाळकर,महानंदा पाटील,मानव अधिकार संघटनेचे दादासो सुतार,मार्तंड कांबळे,संतोष यलगार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!