April 18, 2026 2:52 am

जुगार अड्ड्यावर छापा :१४ जणांना अटक, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त..

कोल्हापूर : लोकहिरा न्यूज प्रतिनीधी .

मार्केट यार्ड परिसरातील राजीव गांधी वसाहतीतील एका खोलीत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगार अड्ड्यावर अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. गुप्त माहितीनुसार केलेल्या या धाडीत जुगार खेळत असलेल्या १४ जणांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून ₹२,८६,७४० किमतीचा रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकलींसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणी राहुल यशवंत पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

अटक केलेले आरोपी :

सतीश बाजीराव चव्हाण (39), चेतन बंडू कुराडे (35), धर्मा दौलू कांबळे (66), उमेश बाजीराव जाधव (38) — (वर उल्लेखित चौघे राजीव गांधी वसाहत)

श्रीशैल शरणाप्पा आडके (50), शिवकुमार चंद्रशेखर इंडी (33), मल्लिकार्जुन बसलिंगाप्पा रामपूर (46), मुजाहिद गौसलाजम चमनशेख (38), मल्लिकार्जुन शरणाप्पा रायगोंडा (55), आसगरअल्ली ताजुद्दीन शेख (37), मुसद्दीक मोहम्मदहनिफ मुजावर (31) — (सर्व उचगाव, ता. करवीर)

बसवराज शिवराय नायकवडी (39), चिदानंद विरुपाक्ष बहिरजी (69), अमोल रमेश गवळी (41) — (तिघे टेंबलाईवाडी, कोल्हापूर)

  • पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!