October 28, 2026 7:09 am

जयवंत महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

इचलकरंजी : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी नितीन दबडे

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल,

जयवंत महाविद्यालय इचलकरंजी, राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, दिपाली ऑप्टीकल्स इचलकरंजी आणि नॅब नेत्र रुग्णालय, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर जयवंत महाविद्यालय, शहापूर-इचलकरंजी येथे संपन्न झाले.

या शिबिरात नॅब नेत्र रुग्णालय, मिरज येथील तज्ञ नेत्र चिकित्सकांनी नागरिक, विद्यार्थी व पालकांची सखोल नेत्र तपासणी केली. दृष्टीदोष, डोळ्यांची जळजळ, पाणी येणे आदी तक्रारींचे निदान करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे गरजू रुग्णांना डोळे तपासून नंबरचे चष्मे फ्रेमसह केवळ अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले. अनेक जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.

या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष रो. विमलकुमार बंब, सेक्रेटरी रो. प्रमोद महाजन, जयवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर जमादार, IQAC च्या प्रा. डॉ. वैजयंता पाटील, NSS चे प्रा. विजयकुमार साठे यांचे सहकार्य लाभले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. सुरज मुल्ला, प्रा. डॉ. येवन आवळे, प्रा. सुषमा नामे, प्रा. रविराज रानगे, प्रा. राकेश शेटके, प्रा. वैशाली सामंत व NSS स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!