August 3, 2026 5:08 pm

‘आदर्श’चा असद ठरला इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक!

‘आदर्श’चा असद ठरला इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक!

इचलकरंजी | लोकहिरा न्यूज प्रतिनिधी (नितीन दबडे)

आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर, इचलकरंजीच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका यशस्वी अध्यायाची भर पडली आहे. शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी चिरंजीव असद समीर मोमीन याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक होण्याचा मान मिळविला आहे. या उज्ज्वल यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

असदच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद फाटक, कार्याध्यक्ष श्री. रमेश मर्दा, श्री. गोवर्धन बोहरा, श्री. संजय होगाडे, श्री. पवन लोकरे, श्री. डी. एम. बिरादार, सौ. मिनाक्षी तंगडी आणि सौ. शकुंतला जाधव यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशामध्ये विद्यार्थ्याच्या आई-वडिलांचे, विशेषतः आईचे प्रोत्साहन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या योगदानाबद्दलही संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता खोचरे, रामभाऊ जगताप हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अशोक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. नूतन चव्हाण, सौ. नंदा घाट, सौ. शीला बिरादार, सौ. कल्याणी जाधव, सौ. नीता चव्हाण आणि श्री. नागेश चील्लाळ या शिक्षकांचे परिश्रम व मार्गदर्शनही मोलाचे ठरले. या सर्वांचे संस्थेच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.

असद समीर मोमीनच्या या यशामुळे शाळा, पालक आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!