August 3, 2026 5:01 pm

इचलकरंजीतील डॉ. सरोजिनी नायडू विद्यालयात प्रवेशोत्सव व नशामुक्ती अभियान उत्साहात

इचलकरंजी, लोकहिरा न्यूज प्रतिनिधी : इचलकरंजी महानगरपालिका संचलित डॉ. सरोजिनी नायडू विद्यालय क्र. ४३, इचलकरंजी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शाळा प्रवेशोत्सव व नशामुक्ती अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमास इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. पल्लवी पाटील प्रमुख उपस्थित होत्या. तसेच नगरसेवक श्री. उदयसिंग पाटील, श्री. सचिन राणे, सौ. रुपाली कोकणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष सुतार व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुयोग्य व नेटके नियोजन पाहून आयुक्त सौ. पल्लवी पाटील यांनी शाळेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व तसेच नशामुक्त जीवनाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या सुमारे ५० विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी नशामुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थी, पालक व उपस्थितांनी नशामुक्त समाज घडविण्याची शपथ घेतली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री. विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!