
लोकहरा न्यूज वृत्तसेवा:-



चंदगड तालुक्यातील मजरे शिरगाव व झांबरे
ग्रामस्थांमध्ये विविध विषयांवर जनजागृती
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत समाजकार्य प्रोग्रामतर्फे ‘गाव सहभागी मूल्यावलोकन’ (PRA: Participatory Rural Appraisal) हा समाजकार्य अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चंदगड तालुक्यातील मजरे शिरगाव व झांबरे या गावांमध्ये 23 फेब्रुवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2027 या दरम्यान राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमामध्ये समाजकार्य विभागातील सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक हे विविध उपक्रमात सहभाग घेत असून गावभेट, कुटुंबभेट, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांसोबत चर्चा, तसेच गावातील विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक परिस्थितीचा अभ्यास करण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये नमूद असलेल्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्याचा अनुभव मिळत असून समाजाच्या गरजा, समस्या, परिणाम, कारणे व उपलब्ध साधनसंपत्ती यांचे प्रत्यक्ष आकलन होत आहे.
या समाजकार्य उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामस्थांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करणे, ग्रामसहभाग वाढविणे, विविध शासकीय योजनांची माहिती घेणे, लोकांचे राहणीमान, दिनचर्या याची माहिती घेणे, गावातील वेगवेगळ्या गटातील लोकांसोबत गट चर्चा करणे, संस्था माहिती घेणे इ. आहे.
समाजकार्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक, युवती, महिला व बालके यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.













