August 3, 2026 6:56 pm

इचलकरंजी रेल्वे समितीच्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

8 मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिना निमित् जाहिरात व पुरस्कारा साठी संपर्क 7276756577

 इचलकरंजी– लोकहिरा न्यूज प्रतिनिधी;-नितीन दबडे 

नियोजित हातकणंगले इचलकरंजी रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी यासाठी सोमवारी इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले यावेळी विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्था, व रेल्वे प्रेमींनी मोठ्या प्रमाणात येऊन पाठिंबा दिला. तसेच इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या येथून पुढे होणाऱ्या सर्व आंदोलनाला व चळवळीला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

 गेल्या अनेक वर्षापासून राजकीय उदासीनतेमुळे हातकणंगले- इचलकरंजी हा आठ किलोमीटर रेल्वे मार्ग निधी अभावी रखडला आहे. रेल्वे कृती समिती सतत खासदार, आमदार तसेच शासन पातळीवर पाठपुरावा करत आहे. वर्षाला फक्त इचलकरंजी शहरातून शासन दरबारी 5000 कोटी GST जमा होतो. पण त्या मानाने इचलकरंजीला मिळते काय? वस्त्र नगरी वासियांना बाहेरगावी जाण्यासाठी हातकणंगले किंवा कोल्हापूर जावे लागते.   इचलकरंजी येथे रेल्वे स्टेशन झाल्यास इचलकरंजी मधील व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळेल. आणि वस्त्र नगरीकडे मिनी मुंबई म्हणून पाहिले जाईल. 

कारण येथे इचलरकंजी मधून आर्थिक वाढवायचे प्रमाण जादा आहे.  पण लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव (आबा) यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयासमोर एक लक्षवेधक दिवसीय धरणे आंदोलन हाती घेण्यात आले.

यावेळी विविध मान्यवरांनी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा व्यक्त केला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव मदन कारंडे, उपमहापौर अनिल डाळ्या नगरसेवक सुशांत कलागते, बाळासाहेब कलागते, अभिषेक वाळवेकर, अमृतमामा भोसले, राजू पुजारी, संतोष सावंत, रणजीत अनुसे, प्रमोद बचाटे, उमाकांत दाभोळे, नगरसेवक नंदकुमार पाटील, सचिन राणे, प्रदीप धुत्रे, सुकुमार पाटील सर, विनय महाजन उमेश पाटील, पुंडलिकराव जाधव,अभिजित पटवा, मनीष आपटे जोगेश्वरी क्रिएशन के.के.कांबळे,अभिजित रवंदे,डॉ.अमित शर्मा,पंकज त्रिपाठी,ब्राह्माण युवा मंच,वकील संघटना,मराठा महासंघ,इचलकरंजी नागरी  मंच  यासह व्यापारी, उद्योजक वकील,रेल्वे प्रेमी नागरिक व भगिनी इत्यादींचा समावेश होता. तसेच लाखो  नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

    रेल्वे कृती समितीच्या प्रांताधिकारी सदस्यांनी उपस्थित  नगरसेवक, वकील डॉक्टर, यांचे स्वागत केले.

व्यासपीठावर रेल्वे कृती समितीच्यावतीने वेळोवेळी केलेल्या पाठपुरावाचे लक्षवेधक फोटो व रेल्वे पोस्टर लावण्यात आले होते.

  प्रांताधिकारीसो कार्यालय जवळ सकाळी 10 ते सायंकाळी 5  पर्यंत खालील रेल्वे कृती समिती सदस्य धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.  अजय जाधव (आबा), यांनी तसेच अनेक मान्यवरांनी रेल्वे इचलकरंजी मध्ये येण्यासाठी उपस्थितीं ना तसेच नागरिकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल असे सुद्धा सांगितले

यावेळी  गुरुनाथ म्हातूकडे,पांडुरंग पिसे, रमेश शर्मा, धर्मराज जाधव, नंदकुमार बांगड ,मारुती पाटील ,मनोहर जोशी, विजय कोळेकर (सदलगा) , बाळासाहेब नरशेट्टी भगवान भूते ,सागर रावण, महेंद्र जाधव, जतिन पोतदार, संदीप ठोके ,विजय हावळ राकेश शेटके ,दीपक पंडित ,प्रदीप कांबळे,अरविंद शर्मा ,विनोद जाधव,अँड .ओंकार कुरडे व अशोक पाटणी हे सदस्य धरणे आंदोलनात सहभागी होते. पत्रकार, पत्रलेखक सामाजिक कार्यकर्ते, वस्त्र नगरवासियांनी यांनी सुद्धा या एक दिवसीय आंदोलनाला रेल्वे इचलकरंजी मध्ये आलीच पाहिजे करीता पाठिंबा दर्शविला..

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!