August 3, 2026 5:42 pm

निवडणूक भत्तासाठी शुक्रवारी महापालिके समोर शंकध्वनी : राजेंद्र कोरे

कोल्हापूर लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:

8 मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिना निमित् जाहिरात व पुरस्कारा साठी संपर्क 7276756577
निवडणूक भत्ता मिळावा यासाठी कंकाळ यांना निवेदन देताना राजेद्र कोरे

कोल्हापूर दि. १६ : महानगरपालिकेची निवडणूक होऊन एक महिना पूर्ण झाला तरी निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या राखीव कर्मचाऱ्यांचा भत्ता आज अखेर मिळालेला नाही. गुरुवार पर्यंत हा भत्ता न मिळाल्यास शुक्रवारी महानगरपालिकेच्या समोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिला आहे. उपायुक्त पारितोष कंकाल यांनी निवेदन स्वीकारले.

       सदरचा भत्ता तात्काळ मिळावी यासाठी महासंघाच्या वतीने आपणांस दोन वेळा निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे. तसेच मा. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ सो, लेखाधिकारी राजश्री पाटील सो, तसेच उपायुक्त पारितोष कंकाळ सो यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सादर कर्मचाऱ्यांना मानधन देण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

      निवडणुकीसाठी राखीव कर्मचारी म्हणून नियुक्त कर्मचारी, पोस्टल मतदानासाठी नियुक्ती केलेले कर्मचारी, मतमोजणीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी, यांच्यासह आशा सेविका व बी.एल.ओ.यांनाही मानधन मिळालेले नाही.

 गुरुवार पर्यंत या मानधन देण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर महानगरपालिका समोर खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ तसेच सर्व  राखीव कर्मचारी, व मानधन न मिळालेले कर्मचारी यांच्यासह शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!