समाजवादी नेते व अर्थतज्ञ् सदानंद वर्दे यांचा स्मृतिदिन.
लोकहिरा न्यूज प्रतिनिधी ;-

राष्ट्र सेवा दल पुणे येथील:- साने गुरुजी स्मारक येथे. प्रौढ शाखा भरवून साजरा केला. यावेळी कल्याणहुन. सुहास भाऊ कोते व नांदेड हुन श्याम भाऊ निळंगेकर, खास उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष दीपाली आपटे, संदेश दिवेकर दत्ता पाकिरे, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश कदम, अक्षय सूनके, प्रियांका ढगे, संजय गायकवाड, व अन्य युवा साथी सहभागी झाले होते. सुदर्शन शिंदे ,मिलिंद कांबळे यांनी शाखा नायक म्हणून काम पाहिले सुहास भाऊ यांनी सेवादल ध्वजारोहन केले. तर श्याम निलंगेकर यांनी ध्वजावतरन याप्रसंगी सुहास भाऊ, दीपाली आपटे, संजय गायकवाड. यांनी वर्देसर यांच्या आठवणी शेअर केल्या. त्यांच्या सारखी ध्येय्य निष्ठ कार्यकर्ते आपण निर्माण करायला हवेत ते काम करणे महत्वाचे आहे. श्याम निळंगेकर यांनी आजचा समाज नपूंसक झालेला असून, क्रांतीकारक तरुणांची संघटनेला व समाजाला गरज असल्याचे आग्रहाणे सांगितले. दत्ता पाकिरे, संदेश दिवेकर बाळासाहेब गायकवाड यांनी या चर्चेत चांगले योगदान दिले. तरुण कार्यकर्तेयांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये आम्हाला योग्य मार्गदर्शन गरज प्रतिपादन केले सेवादलाचे भविष्य आम्ही असूतर आम्हाला योग्य मार्गदर्शन करा. जबाबदारी द्या सेवादलात आता काय चालू आहे. हे आम्हाला समजत नाही. मात्र काही मुद्दे वरवर समजतात, तेंव्हा आमच्या वर विश्वास टाका.
संदेश दिवेकर, बाळासाहेब गायकवाड.यांनी श्याम यांच्या एकाकी लढ्याचे कौतुक केले. त्यांचे अभिनंदन केले. श्याम यांनी लढा काय होता. ते सांगितले. तसेच 2022 ची सेवा दल घटना दुरुस्ती प्रस्ताव हा धर्मादाय आयुक्त तसा ठराव एकमताने मंजूर केला. यावेळी दत्ता पाकिरे यांनी अनुमोदन केले. शेवटी भुलो मत भुलो मत सेवा दल बढाना है सेवा दल बढाना है परिवर्तन लाना है ✊या घोषणाने सांगता झाली.
पुणे धर्मादाय आयुक्तांचा महत्वपूर्ण आदेश
*कपिल पाटील, नितीन वैद्य यांचा अर्ज फेटाळला*
*राष्ट्र सेवा दलातील विद्यमान मनमानी संपुष्टात*
पुणे येथील लोकहिरा प्रतिनिधी;-
माजी आमदार कपिल पाटील, माजी अध्यक्ष, पत्रकार नितीन वैद्य यांनी सादर केलेला राष्ट्र सेवा दल, या संघटनेतील घटना दुरूस्तीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. सत्य कागदपत्रांची पुर्तता करता न केल्याने धर्मदाय सहाय्यक आयुक्तांनी या मंडळींना तडाखा दिला आहे. गेली काही वर्ष संघटनेत चाललेल्या बेकायदा हस्तक्षेपामुळे उद्भवलेला वाद आता संपुष्टात येणार आहे.
राष्ट्र सेवा दल या संघटनेचे विश्वस्त असल्याचं भासवत आपल्या सोयीने राष्ट्र सेवा दलाच्या घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव ज्येष्ठ पत्रकार नितीन वैद्य, माजी आमदार कपिल पाटील आणि अबेद खान यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सहा. धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे दाखल केला होता. राष्ट्र सेवा दलातील पदाधिकारी नियुक्ती आणि कालावधी या संदर्भात ही घटना दुरुस्ती होती. मात्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम निलंगेकर यांनी या घटना दुरुस्तीबाबत आक्षेप अर्ज दाखल केला होता. कपिल पाटील हे विश्वस्त नाहीत, संघटनेचे सदस्य नसलेले लोक पदाधिकारी करण्यात आले होते. बेकायदेशीरपणे पदं मिळवत ही मंडळी आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आक्षेप श्याम निलंगेकर यांनी घेतला होता.
घटना दुरुस्तीच्या योजना प्रस्तावाला श्याम निलंगेकर यांनी आक्षेप घेतल्यानंतर कपिल पाटील, नितीन वैद्य, अबेद खान यांची अडचण झाली. ते किंवा त्यांचे वकील हे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांसमोर एकाही तारखेला हजर झाले नाहीत. आपला दावा सिद्ध करणारी कागदपत्रही त्यांना सादर करता आली नाहीत, श्याम निलंगेकर मात्र प्रत्येक तारखेला हजर राहून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते.
अखेर चार वर्षांनी म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांनी कपिल पाटील आणि इतरांनी दाखल केलेला प्रस्ताव फेटाळून लावला. तसा आदेशही जारी केला आहे.
कपिल पाटील आणि मंडळी आड मार्गाने राष्ट्र सेवा दलात शिरले. आपली राजकीय ताकद वापरून त्यांनी संघटना ताब्यात घेत अरेरावी चालवली. सेवा दलाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, सेवाभावी पूर्णवेळ कार्यकर्ते यांना अपमानास्पद वागणूक देत संघटनेतून बाहेर काढलं. पाटील यांनी आपली माणसं घुसवली. बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार केला. यावरून संघटनेत संघर्ष सुरू झाला. आता या मंडळींची हुकूमशाही संपली आहे, असं श्याम निलंगेकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे.













