April 18, 2026 2:52 am

हवा डि.जे, तर त्यांना जेलची हवा !गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट प्रकरणी चौघांना शिक्षा.

मंडळाचे पदाधिकारी.
लोकहिरा आपणास जाहिरात व पुरस्कारा साठी आवाहन करीत आहे संपर्क 7276756577

कोल्हापूर- लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:- गणेश नारायणकर

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत डीजेचा दणदणाट करीत ध्वनिप्रदूषण करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून चौघांच्यावर दोषारोप दाखल झालेल्या राजारामपुरीतील गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव आणि खजिनदार अशा चौघांना एक वर्षाची शिक्षा आणि 15  हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.प्रथमवर्ग  न्यायदंडाधिकारी श्रीमती पंकज रजपूत यांनी शिक्षा सुनावली आहे.यात मंडळाचे अध्यक्ष योगेश दिपक मोहिते,उपाध्यक्ष कृणाल हिंतेंद्र पाटील,सचिव इंद्रजित सर्जेराव निंबाळकर आणि खजिनदार पंकज श्रीरंग चौगूले (चौघे रा.बारावी गल्ली,     राजारामपुरी) यांचा समावेश आहे.तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या आदेशाने योगेश मोहिते यांच्यासह जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा प्रकार 2017 ला घडला होता.या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.सरकारी वकील म्हणून सविता पाटील यांनी काम पाहिल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!