August 3, 2026 5:47 pm

जबरी चोरी प्रकरणी सात जणांना अटक.अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून एक कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा मुद्देमाल जप्त.

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :-सागर चौगुले

 

कोल्हापूर – किणी वडगाव येथे मुंबईकडे जात असलेल्या खाजगी बसच्या क्लिनरच्या मानेला कोयता लावून बस चालकाला गाडी थांबण्यास भाग पाडून 60 किलो चांदी 10 ग्रॅम सोने व मशनीरीचे पार्ट असा एकूण 01 कोटी 22 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल काढ़ून घेऊन पळून गेलेले आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या 12 तासात अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी अक्षय बाबासाहेब कदम (वय 31.रा.विक्रमनगर), सैफू बशीर अफगाणी (क्लिनर) जैद बशीर अफगाणी (वय 21. दोघे रा.मदिना कॉलनी,उचगाव), सुजल प्रताप चौगूले (वय 20) आदेश अरविंद कांबळे (वय 18) आदिनाथ संतोष विपते (वय 25. तिघे रा.आकाशवाणी रोड,सांगली) यांना अटक केली.  

 

 

 

अधिक माहिती अशी की,न्यु अंगडीया सर्व्हिस ही कंपनी दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीची आहे.त्यांच्याकडे मच्छिंद्र नामदेव बोबडे (वय 47.रा.सावित्री प्लाझा,भेंडे गल्ली,शिवाजी चौक) हे नोकरीस आहेत.ते नेहमी कोल्हापूर ते मुंबई पार्सल ने-आण करण्याचे काम करीत असतात.ते नेहमी प्रमाणे सोमवार दि.22/12/2025 रोजी रात्री अकराच्या सुमारास अशोक ट्रॅव्हल गाडी नं.एमएच-09-जीजे-7272. या गाडीतून 60 किलो चांदी व 10 ग्रॅम सोने आणि मशनीरीचे पार्ट असे तीन पार्सल घेऊन चालले होते.त्यावेळी तावडे हॉटेल तीन जण चढ़ले.त्यानंतर वाठार येथे गाडी आल्यानंतर मागील सीट वरुन पुढ़े ड्रायव्हरच्या केबीन मध्ये येऊन बसले.त्यानंतर केबीन मध्ये बसलेल्या एकाने ब्यँगेतील कोयता काढ़ून क्लिनरच्या मानेला कोयता लावून बस चालकाला बस थांबवण्यास भाग पाडून बोबडे व क्लिनरला मारहाण करून खाली उतरवले.यावेळी मोटारसायकल वरुन आलेल्या इतर साथीदारांनी मच्छिंद्र बोबडे कडुन असलेला ऐवज जबरदस्तीने कोयत्याचा धाक दाखवून काढ़ून घेऊन पळून गेले.याबाबत बोबडे यांनी मंगळवार दि.23 रोजी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण व वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी घटना स्थळी भेट देऊन पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ ,पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे ,जालिंदर जाधव यांची पथके तयार करून तपास चालू करून आसपासच्या परिसराची पाहणी करत त्या परिसरातील सीसीटिव्हि फुटेजची पाहणी करून माहिती घेत असताना सदरचा गुन्हा विक्रमनगर येथील अक्षय कदम याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली.सदरचा चोरीचा मुद्देमाल विक्रमनगर येथील घरात ठेवल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अक्षय कदम याला त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात चोरीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून अक्षय कदमसह त्याच्या साथीदारांना अटक केली.त्याच्या साथीदारांनी सुध्दा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्या सर्वाना पुढ़ील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

सदर आरोपींनी चैनीसाठी आणि कर्जबाजारी असल्याने हा चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.या खाजगी बस वरील क्लिनर हा तीन महिन्यापूर्वी क्लिनर म्हणून काम करीत असून त्याने आपला भाऊ जैदू याला वरील मुद्देमालाची माहिती दिली होती.अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक यांनी दिली.

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण ,सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,संतोष गळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!