

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर येथील
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महत्त्वाची कारवाई केली असून या प्रकरणात मुख्य आरोपीसह एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक मूळ कागदपत्रे आणि रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने व मुरगूड पोलीस ठाणे यांच्या सहकार्याने दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 1.15 वाजता सोनगे (ता. कागल) येथील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकून हा कट उघडकीस आणला. प्रारंभी घटनास्थळी 7 आरोपी ताब्यात घेतले गेले, तर मुख्य सूत्रधार फरार होता.
यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. सातारा) तसेच अन्य 11 आरोपींना अटक केली. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाणे बी.एन.एस. कलम सह 1982 च्या प्रतिबंधक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सर्व आरोपींना 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळाली असून तपास पुढे सुरू आहे. गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.या
कारवाईत
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलीस उपनिरीक्षक : जालिंदर जाधव,संतोष गळवे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरगूड: शिवाजी करे,
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव,
पोलीस अमलदार : युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदीप पाटील, राजू कोरे, रोहित मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, महेश आंबी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, शिवानंद मठपती,
सायबर पोलीस सुरेश राठोड, यांचा समावेश होता.












