April 17, 2026 11:05 pm

कंटेनर ची मोटरसायकलला जोरदार धडक..

शहापूर येथील (लोकहिरा न्यूज वृत्तसेवा)

*कंटेनर ची मोटरसायकलला जोरदार धडक एकजन ठार.*

दिनांक 21/11/2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजताचे सुमारास कोंडीचे ते यड्राव जाणारे रोडवर बेधरवसाहत, यड्राव येथे मयत चंद्रकांत सुरेंद्र किनिंगे, वय 57, राहणार जैनमंदिर जवळ बुबनाळ, तालुका शिरोळ .जिल्हा कोल्हापुर हा त्याचे होन्डा शाइन मोटर सायकल नंबर MH-09-EE-6438 वरुन यड्रावकडे जात असताना बेघरवसाहत, यड्राव कडुन एक अशोक लेलॅन्ड कंपनीचा कंटेनर नंबर – KA-48-A-1435 या वरील चालक आरोपीने सदरचा कंटेनर रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हायगयीने व बेदरकारपणे, भरधाव वेगाने चालवुन यातील मयत यांचे मोटर सायकलला कंटेनरची जोराची धडक देवुन अपघात करून यातील मयतास किरकोळ व गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत होवुन अपघात ठिकाणाहुन पळुन गेलेने यात  अशोक लेलॅन्ड कंपनीचा कंटेनर नंबर KA-48-A-1435 वरील चालकाविरुध्द शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे व सहाय्यक फौजदार मुंगसे साहेब करत आहेत.

2 thoughts on “कंटेनर ची मोटरसायकलला जोरदार धडक..”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!