April 18, 2026 12:24 am

पलायनावर असलेला सराईत आरोपी राजारामपुरी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात..

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:-राजारामपुरी गुन्हे शोध पथकाची कारवाई; विविध जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये पाहीजे असलेला सराईत आरोपी ताब्यात

कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पाहीजे असलेला सराईत आरोपी हर्षल सदाशिव खरात (वय 29, रा. कोल्हापूर) यास अटक केली आहे. आरोपीवर कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर ग्रामीण या तीनही जिल्ह्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असून तो अनेक दिवस पलायनावर होता.

शाहूपुरी पोलीस ठाणे , नातेपुते पोलीस ठाणे, तसेच लांजा पोलीस ठाणे (रत्नागिरी) या ठिकाणी गुन्हे नोंद असून, सदर गुन्ह्यांनंतर आरोपी आपली ओळख लपवून फरारी होता.

20 नोव्हेंबर 2025 रोजी राजारामपुरी गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी हर्षल खरात हा प्रतिभानगर परिसरातील एसबीआय बँकेजवळ येणार आहे. त्यानुसार पथकाने रेड्याची टक्कर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, पोलीस अमलदार विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सुशांत तळप यांनी सहभाग घेतला.

सदरची कारवाई  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर प्रकियेसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

3
1

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!