![]()
![]()
![]()
इचलकरंजी : साप्ताहिक लोकहिरा न्यूजचे प्रतिनिधी राजू टिळंगे तसेच सामाजिक कार्यकर्ते गोविंद टिळंगे यांचे बंधू कै. श्री. चंद्रकांत चतुरदास टिळंगे (जेष्ठ बंधू) यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोग्य सांस्कृतिक भवन, विक्रमनगर, इचलकरंजी येथे भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कै. चंद्रकांत टिळंगे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले. उपस्थित नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार व हितचिंतकांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमास विष्णुपंत नेतले गोविंद ती टिळंगे, राजू टिळंगे, नितेश टिळंगे,रोहन मिनेकर आदर्श टिळंगे, विजय टिळंगे,जयसिंग नेतले आकाश टिळंगे, सगुन टिळंगे, विकास टिळंगे, मुकेश टिळंगेहिरालाल मिनेकर निवास गावडे कैलास गागडे, इंद्रजीत गागडे मुकुंद गागडे यांच्यासह टिळंगे गागडे नगरकर परिवारातील सदस्य व आप्तेष्ट उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. सोमनाथ महाराज लामकाणे यांचे भक्तिमय प्रवचन झाले. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या प्रवचनातून जीवनमूल्ये, अध्यात्म, भक्ती आणि सदाचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रवचनामुळे कार्यक्रमस्थळी अत्यंत भक्तिमय व भावस्पर्शी वातावरण निर्माण झाले होते.
कै. चंद्रकांत टिळंगे यांच्या प्रेमळ स्वभावाच्या, कुटुंबाप्रती असलेल्या जिव्हाळ्याच्या आणि त्यांच्या आठवणींना यावेळी उपस्थितांनी उजाळा दिला. “माया आपली स्मरते, येथे डोळ्यातून पाणी, ओठ आजन्म गातील आपल्या आठवणी…” या भावनेतून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समस्त टिळंगे परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.