सामाजिक कार्याची दखल; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून महत्त्वाची जबाबदारी
इचलकरंजी | लोकहिरा न्यूज 
वार्ताहर – नितीन दबडे
इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले श्री. जोहेब दस्तगीर हलगले यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, इचलकरंजी शहर यांच्या वतीने त्यांची अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहणाऱ्या जोहेब हलगले यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अल्पसंख्याक समाजासह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे, तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मनापासून साधावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, नागरिकांच्या प्रश्नांना न्याय आणि समाजहितासाठी सकारात्मक कार्य करण्याचा संकल्प जोहेब हलगले यांनी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
💐 जोहेब हलगले यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹








